बारावीत कमी मार्क पडले म्हणून करिअर संपलंय म्हणून नका... हे कोर्स करा आणि मिळवा लाखात पगार
तुम्हाला बारावीत कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय होणार या विचाराने निराश झाला असाल तर काळजी करु नको. हे कोर्स करुन तुम्हाला लाखोंमध्ये पगार मिळू शकतो.
1/5
2/5
इव्हेंट मॅनेजमेंट : तुमच्याकडे पुरेसे चांगले संवाद कौशल्य असेल तर इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात तुमचा कोणीही हात पकडू शकत नाही. सध्या लोकांना सगळं आयतं मिळवण्याची सवय आहे आणि हे क्षेत्र अशा लोकांची मोठी मदत करु शकतं. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करून तुम्ही दरमहा लाखोंची कमाई करू शकता आणि स्वतःचा व्यवसायही सुरु करु शकता.
3/5
सिनेमॅटोग्राफी : सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात रील्स बनवताना, एखादा व्हिडीओ शूट करताना काहीजण आपली कला दाखवताना आपण पाहिलेच असतील. त्यामुळे आता रील्स, चित्रपट आणि वेब सिरीजची वाढती मागणी लक्षात घेता सिनेमॅटोग्राफी हा करिअरचा एक चांगला पर्याय आहे. यासाठी देशातील चांगल्या फिल्म स्कूलमधून सिनेमॅटोग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी मिळवून तुम्ही सिनेमॅटोग्राफर बनू शकता आणि लाखोंची कमाई करू शकता.
4/5