आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार, कसं ते जाणून घ्या

CBSE Result news in Marathi: सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. 

Apr 29, 2024, 14:58 PM IST
1/8

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेतला आहे. CBSE अंतर्गत, 10वी आणि 12वीचे विद्यार्थी त्यांची उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासू शकतात.

2/8

बोर्डाच्या निर्णयानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोर्डाच्या वेबसाइटवर एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर त्यांची गुणवत्ता तपासू शकतात.

3/8

बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रक्रिया सुरू होईल.  या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

4/8

सीबीएसईने उमेदवारांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

5/8

लिंक ओपन झाल्यानंतर ही सुविधा फक्त पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे.  

6/8

 विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देखील घेऊ शकतात. यासाठीही अर्ज करावा लागेल. 

7/8

यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रति विषय 700 रुपये आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रति विषय 500 रुपये मोजावे लागणार आहेत.  

8/8

एखाद्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण दिल्याचे आढळून आल्यास अशा परीक्षकांवर बोर्ड कारवाई करेल. दरम्यान, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सीबीएसईचा निकाल जाहीर होऊ शकतो. यावेळीही गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण गुणांची माहिती दिली जाईल.