कॅन्सरच्या Silent Signs कडे करुन नका दुर्लक्ष! शरीरात हे बदल दिसल्यास डॉक्टरांना भेटा

Silent Signs Of Cancer By Your Body: आपलं शरीर अनेकदा अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या लक्षणांबद्दल छोटे छोटे संकेत देत असतं. हे संकेत कळणं आणि वेळीच उपचार सुरु केल्यास या आजाराच्या कचाट्यात सापडण्यापूर्वीच त्यावर उपचार सुरु करता येतील.  आपलं शरीर कॅन्सरसंदर्भात दाखवणारे 'साइलेंट सिग्नल्स' कोणते हे जाणून घेऊयात...

| Apr 29, 2024, 11:51 AM IST
1/13

Silent Signs Of Cancer By Your Body

मानावाने अगदी कोरोनावरही उपचार शोधून काढत मागील शतकभरामधील सर्वात मोठ्या साथीच्या रोगावर मात मिळवली. मात्र अनेक दशकांपासून मानवाला कर्करोगावर म्हणजेच कॅन्सरवर ठोस उपचार शोधता आलेले नाहीत. त्यामुळेच कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो.

2/13

Silent Signs Of Cancer By Your Body

कॅन्सर जीवघेणा असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे प्राथमिक स्टेजमध्ये असताना अनेक रुग्णांमधील कॅन्सरचं निदान होत नाही. मात्र कॅन्सरसंदर्भात प्राथमिक स्टेजमध्ये माहिती मिळवणं आणि कॅन्सर डिटेक्ट करणं शक्य आहे. कॅन्सरच्या अनेक लक्षणांकडे अनेकदा कानाडोळा केला जातो. कॅन्सरची प्राथमिक लक्षणं ही सर्वसामान्य आजारांशी मिळती-जुळती असल्याने त्याकडे दुर्लक्ष होतं.

3/13

Silent Signs Of Cancer By Your Body

त्यामुळेच आपलं शरीर अनेकदा अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या लक्षणांबद्दल छोटे छोटे संकेत देत असतं. हे संकेत कळणं आणि वेळीच उपचार सुरु केल्यास या आजाराच्या कचाट्यात सापडण्यापूर्वीच त्यावर उपचार सुरु करता येतील.  आपलं शरीर कॅन्सरसंदर्भात दाखवणारे 'साइलेंट सिग्नल्स' कोणते हे जाणून घेऊयात...

4/13

Silent Signs Of Cancer By Your Body

अचानक वजन कमी होते - अचानक वजन कमी होणं हे कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण आहे. झपाट्याने वजन कमी होत असेल तर ते कॅन्सर वेगाने वाढत असल्याचं लक्षण असू शकतं. कॅन्सरमध्ये शरीरातील पेशींचं वेगाने विभाजन होतं. त्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा शरीरातील मेदापासून म्हणजेच फॅट्सपासून मिळवली जाते. त्यामुळे अचानक वजन कमी होतं.

5/13

Silent Signs Of Cancer By Your Body

शरीरात गाठ येणे - शरीरात कोणत्याही कारणाशिवाय गाठ येणे किंवा एखाद्या ठिकाणी सूज येणं हे सुद्धा कॅन्सर लक्षण आहे. अचानक शरीरामध्ये मांसाचा गोळा तयार होतो. खास करुन छाती, मान, खांद्याजवळ अशा गाठी आढळून येतात. असं काही दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा

6/13

Silent Signs Of Cancer By Your Body

अन्न गिळताना त्रास होणे - तोंड, गळा किंवा पाचनसंस्थेशी संबंधित कॅन्सर असेल तर ट्यूमरमुळे अन्न गिळण्यास त्रास होतो.   

7/13

Silent Signs Of Cancer By Your Body

रक्तस्राव - विष्ठेवाटे रक्त पडणे, महिलांच्या मासिक पाळीदरम्यान अती रक्तस्राव होणे किंवा नाकावाटे अथवा घशातून रक्तस्राव होणे हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

8/13

Silent Signs Of Cancer By Your Body

सतत थकवा जाणवणे - फारशी कष्टाची कामं न करता थकवा जाणवत असेल तर वेळीच सावध झालं पाहिजे. खरं तर थकवा जाणवणे ही सामान्य बाब आहे मात्र कोणत्याही कारणाशिवाय थकाव जाणवत असेल आणि आराम केल्यानंतरही उत्साही वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे असं होणं सुद्धा कॅन्सरचं प्राथमिक लक्षण आहे.

9/13

Silent Signs Of Cancer By Your Body

सतत अंगदुखी - सतत अंग दुखणे, हाडं दुखणे यासारखा त्रास वारंवार होत असेल तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.  

10/13

Silent Signs Of Cancer By Your Body

मासिक पाळीच्या चक्रात सातत्याने बदल - महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रात सातत्याने बदल होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. मासिक पाळीदरम्यान अती रक्तस्राव होणं किंवा मोनोपॉजनंतरही रक्तस्राव होत असेल तर वेळीच चाचणी करुन घेणं फायद्याचं ठरतं. कारण हे सुद्धा महिलांमधील कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. खास करुन गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर असेल तर अशा समस्या जाणवतात.

11/13

Silent Signs Of Cancer By Your Body

त्वचेतील बदल - त्वचेवरील तिळाचा रंग किंवा आकार बदलणे हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण आहे. तसेच एखादी जखम झाल्यानंतर ती लवकर भरुन येत नसेल तर हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. सतत त्वचेला खाज येणं, जखमा न भरणं ही कॅन्सरीच प्राथमिक लक्षणं आहेत.

12/13

Silent Signs Of Cancer By Your Body

अर्थात वरील सर्व किंवा काही लक्षणं दिसत असतील तर कॅन्सरच आहे असं नाही. मात्र तुम्हाला यापैकी कोणतंही लक्षण दिसत असेल तर त्यासंदर्भात तुमच्या फॅमेली डॉक्टरशी यासंदर्भात नक्की चर्चा करा आणि त्यांची भेट घ्या.  

13/13

Silent Signs Of Cancer By Your Body

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)