7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Mar 02, 2021, 15:20 PM IST

मुंबई : डीए (Dearness Allowance)वाढीची लोक आतुरतेने वाट पाहल आहेत, होळीच्या आधी सरकार या बद्दलची घोषणा करणार का? या कडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. 

1/5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News

कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचारी लॅाकडाउनमुळे घराबाहेर पडलेले नाहीत.  त्यामुळे त्यांचे पैसे अडकले होते. पण आता सरकारच्या नविन नियमानुसार जर कोणी नविन बिमा काढला असेल तर त्याचा प्रिमियम तुम्ही LTC स्कीममध्ये क्लेम करु शकणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता देशातल्या सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  

2/5

राज्य कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा

राज्य कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा

LTC स्कीमचा फायदा आता सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच आता राज्य कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. याचा अर्थ असा की, आता देशातल्या सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.  

3/5

नक्की काय आहे LTC स्कीम

नक्की काय आहे LTC स्कीम

कोरोना काळातली परिस्थीती पहाता मोदी सरकारने LTC स्कीम आणली .ज्याच्या अंतर्गत 12 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत कोणत्याही खरेदीवर 12% पेक्षा जास्त जीएसटी भरला असेल तर त्यांना इनकम टॅक्समध्ये सवलत दिली जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये कॅश देण्याचीही तरतूद आहे.

4/5

डीए वाढीच्या प्रतीक्षेत

डीए वाढीच्या प्रतीक्षेत

कोरोना काळामध्ये  डीएच्या वाढीवरती रोक लावली होती. या महिन्यात सरकारने सध्याची आणि मागील अशी 4 + 4 ची वाढ जाहीर केली. महागाई भत्ता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल. सध्या 17 टक्के लोकांना महागाई भत्ता मिळत आहे.

5/5

होळीच्या आधी होऊ शकते घोषणा

होळीच्या आधी होऊ शकते घोषणा

बजेटनंतर  डीएच्या वाढीची वाट पाहिली जात आहे. फेब्रुवारीमध्ये अपेक्षा केली जात होती की सरकार या स्कीमबद्दल लवकरच काही घोषणा करेल . पण ती अपेक्षा काही पुर्ण झाली नाही. आता नविन महिना चालू होताच या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहे, कारण या महिन्यात होळीचा सण आहे.