7th Pay Commission: 1 जुलैपासून पगारात होणार घसघशीत वाढ !

Mar 16, 2021, 08:34 AM IST
1/4

28 टक्के होऊ शकतो डीए

28 टक्के होऊ शकतो डीए

कोरोनामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी ते जुलै 2020 (3 टक्के) आणि जुलै ते डिसेंबर 2020 (4 टक्के) मधील महागाई भत्ता मिळू शकला नाही. आता जानेवारी ते जुलै 2021 मधील महागाई भत्ता जाहीर करण्यात येणार आहे, जो 4 टक्के असू शकतो. एकूण, 17 टक्के डीए सध्या मिळतोय. जो (3 + 4 + 4) एकत्रितपणे 28 टक्के असू शकतो.  

2/4

बदलून जाईल सॅलरी स्लीप

बदलून जाईल सॅलरी स्लीप

डीएमध्ये वाढ झाल्याच्या घोषणेनंतर पगारावर थेट परिणाम होणार आहे. नियमांनुसार मूळ वेतनाच्या हिशोबाने पीएफ आणि ग्रॅच्यूटी कापली जाते.   

3/4

पेंशनर्सना थेट फायदा

पेंशनर्सना थेट फायदा

डीए मध्ये वाढ केल्याच्या घोषणेनंतर पेंशनर्सना याचा फायदा होणार आहे. डीए 28 टक्के झाल्यानंतर महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. डीए अंतर्गत कोणत्या पेंशनर्सला 10 हजार रुपये मिळणार असतील तर हा आकडा 16 हजार पर्यंत पोहोचू शकतो.

4/4

1 एप्रिलपासून नवे कामगार कायदे

1 एप्रिलपासून नवे कामगार कायदे

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच नव्या कामगार कायद्याची (New Wage Code 2021) अंमलबजावणी होऊ शकते. मोदी सरकार हे कायदे 1 एप्रिलपासून लागू करु शकते. याचा परिणाम तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर होऊ शकतो.