पतेती आणि पारशी नववर्षाच्या खास मराठी शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Message वरुन प्रियजनांना पाठवा संदेश

Parsi New Year Wishes in Marathi : बुधवारी 14 ऑगस्टला पारसी नववर्ष म्हणजे पतेती साजरा करण्यात येणार आहे. याला नवरोज या नावानेही ओळखलं जातं. यादिवशी पारसी लोक अग्निची पूजा करतात आणि नववर्षाचा प्रारंभ करतात. या दिवसानिमित्त पारशी मित्रमैत्रिणींना द्या खास मराठीतून शुभेच्छा 

| Aug 13, 2024, 16:55 PM IST
1/7

राजाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे जावो, पतेती, नवरोज मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करूया, पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

2/7

या वर्षी नवरोज साजरा अधिक आनंदाद साजरे करूया तुम्हाला पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

3/7

आयुष्याचा नवा अध्याय उलगडत असताना पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

4/7

नवीन सुरुवात खूप रोमांचक आहे नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत, सर्वांना पारशी नववर्षाच्या शुभेच्छा!

5/7

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा पारसी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा  

6/7

नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी हॅपी नवरोझ  

7/7

येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नवरोझ आणि पतेतीच्या या शुभदिनी..!