कोंबडी की अंड, पहिला नंबर कोणाचा? साऱ्या जगाला पडलेल्या प्रश्नांच उत्तर सापडलं

Chicken or egg who came first : अंडी म्हणजे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत. ही अंडी शरीराला आवश्यक त्या घटकांचा पुरवठा करतात. हीच अंडी खाताना तुम्हालाही एक सर्वज्ञान प्रश्न पडला आहे का? 

Jan 08, 2024, 14:53 PM IST

Chicken or egg who came first : जगाच्या पाठीवर एक मोठा वर्ग आहे, ज्यांच्या दैनंदिन आहारामध्ये अंड्यांचा दर दिवशी समावेश केला जातो. मग ते कोणत्याही प्रकारे का असेना, अंड्यांचं सेवन केलच जातं. 

1/7

या जगात पहिलं कोण आलं?

Chicken or egg who came first know interesting facts

Chicken or egg who came first : अंड्यांविषयी संपूर्ण जगाला पडणारा एक प्रश्न म्हणजे, या जगात पहिलं कोण आलं, अंड की कोंबडी? तुम्हाला माहितीये का आता या प्रश्नाचं एक निश्चित उत्तर समोर आलं आहे. 

2/7

हैराण करणारं संशोधन

Chicken or egg who came first know interesting facts

अंड आणि कोंबडीबाबत पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनाच्या माध्यमातून दिलं आहे. त्यांनी काही हैराण करणारे संदर्भ जगापुढे मांडले आहेत. 

3/7

सर्वात आधी आली...

Chicken or egg who came first know interesting facts

शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या आधारावर केलेल्या दाव्यानुसार या जगात सर्वप्रथम अंड आलंच नव्हतं. तर, सर्वात आधी कोंबडी किंवा कोंबडाच आला होता. किंबहुना अनेक हजार वर्षांपूर्वी कोंबडी किंवा कोंबडा आज जसे दिसतातते तसे दिसतच नव्हते असंही स्पष्ट केलं.   

4/7

पुढे काळ बदलला आणि...

Chicken or egg who came first know interesting facts

कोंबडी किंवा कोंबडा हजारो वर्षांपूर्वी अंडी देत नव्हते तर, ते पिलांना जन्म देत होते असंही या संशोधनातून समोर आलं. पुढे काळ बदलला, भौगोलिक रचना बदलल्या आणि या प्राणी पक्ष्यांच्या शरीररचनेतही बदल होत गेले. 

5/7

प्रजनन प्रक्रियेत बदल

Chicken or egg who came first know interesting facts

सरत्या वर्षांसोबतच कोंबड्यांच्या प्रजनन प्रक्रियेत बदल होऊन त्यांनी पिलांना जन्म न देता अंड देण्याची क्षमता शरीरात विकसिक केली/ काळानुरूप क्षमता विकसित झाली आणि अखेर जगात कोंबडा-कोंबडीच आधी आली हे सिद्ध झालं.   

6/7

एक्सटेंडेड एम्ब्रायो रेटेंशन

Chicken or egg who came first know interesting facts

शास्त्रज्ञांनी प्रजनन क्षमतेमध्ये असणाऱ्या या भिन्नतेला एक्सटेंडेड एम्ब्रायो रेटेंशन असं नाव दिलं. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार अनेकदा प्राण्यांनी अंड दिल्यानंतर त्यात भ्रूण विकसित होतं. तर, काही भ्रूण अंड देतात तेव्हाच विकसित झालेलं असतं. 

7/7

उत्तर सापडलच

Chicken or egg who came first know interesting facts

अंड आणि कोंबडीवरील या संशोधनामुळं आता अखेर ही बाब समोर आली आहे की या जगात सर्वप्रथम कोंबड्यांच आल्या आहेत!!!