High Cholesterol मुळे उद्भवू शकतो हृदयविकाराचा धोका, Breakfast मध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश

Cholesterol Lowering Breakfast : सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात खूप चांगली आहे. सकाळी सगळ्यात आधी आपण काही हेल्दी खायला हवं. त्यामुळे तुमचे आरोग्य खूप चांगले राहिलं. रोज सकाळी शाळेत किंवा ऑफिसला जाण्याआधी तुम्ही काय खाता? कारण सकाळी तुम्ही जे खाल त्याचा परिणाम तुमच्या दिवस भराच्या एनर्जीवर होईल. सकाळी हेल्दी खा कारण त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सकाळी ब्रेकफास्टला कोणत्या गोष्टींचे सेवण करणे महत्त्वाचे आहे. 

| May 06, 2023, 17:59 PM IST
1/7

सकाळचा नाश्ता टाळला तर काय होऊ शकतं?

Cholesterol Lowering Breakfast

तुम्ही सकाळचा नाश्ता करण टाळलं तर तुमच्या शरिरातीलस लिपोप्रोटीन वाढू शकते आणि लठ्ठपणाचा शिकार होऊ शकता. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह या सारखे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. 

2/7

अंड्याचा सफेद भाग (Egg White)

Cholesterol Lowering Breakfast

जर तुम्हाला अंड खायला आवडत असेल तर सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग खा. त्यानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यासोबतच प्रोटीन देखील मिळते. 

3/7

ओटमील (Oatmeal)

Cholesterol Lowering Breakfast

सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात ही ओटमीलपासून करा. कारण ओटमीलमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ओटमील खाल्यानं अन्न पचनाची प्रक्रिया सोपी होते. तर ते एलडीएल कोलेस्ट्रॉल शरिराच्या बाहेर काढण्यास मदत करते. त्यात सफरचंद, नाशपती किंवा स्ट्रॉबेरी आणि बेरीज घाला. 

4/7

संत्रं (Orange)

Cholesterol Lowering Breakfast

संत्रं  ही एक साधारण फळ आहे जे तुम्हाला कुठल्याही फळांच्या दुकानात मिळेल. संत्र्यात व्हिटामिनी सी मोठ्या प्रमाणात असते. त्यात असलेलं फायबर तुमची पचन शक्ती वाढवण्यास मदत करते. 

5/7

स्मोक्ड सॅलमन (Smoked Salmon)

Cholesterol Lowering Breakfast

सॅलमन माशात ओमेगा -3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यात हेल्दी फॅट्स आणि गूड कोलेस्ट्रॉल असते. सॅलमन खाण्याचे खूप जास्त फायदे आहेत. 

6/7

रताळे (Sweet potato)

Cholesterol Lowering Breakfast

रताळ्यात प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते त्याचे सेवण केल्यानं बॅड कोलेस्ट्रॉल शरिरातून बाहेर टाकण्यास मदत होते. 

7/7

बदाम, शेंगदाणे आणि काजू (Almond, Peanut, Cashew)

Cholesterol Lowering Breakfast

या तीन्ही नट्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. इतकंच काय तर त्यांच्या सेवणानं कोलेस्ट्रॉल कमी होण्याची शक्यता वाढते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) (All Photo Credit : File Photo)