Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

Dec 20, 2018, 10:14 AM IST
1/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

दरवर्षी डिसेंबर महिना उजाडला की सुरुवात होते ती म्हणजे यंदाच्या वर्ष किती लवकर संपलं याची आणि आपण काय केलं नाही याची. काय मिळवलं, काय गमावलं या साऱ्या चर्चांमध्ये एक गोष्ट किंबहुना एक खेळ नकळत डोकं वर काढत असतो. तो खेळ म्हणजे 'सिक्रेट सँटा'. ख्रिसमस म्हणजेच नाताळ या सणामध्ये 'सँटा' म्हणजेच नाताळबाबा येतो आणि रात्री साखरझोपेत असताना आपल्यासाठी तो काही खास भेटवस्तू ठेऊन जातो, अशी गोष्ट अनेकांनाच लहानपणापासून सांगितली जाते. आता नाताळबाबा येतो की नाही हे ठाऊक नाही. पण, आपल्यासाठी कोणीतरी छोटीशी का असेना, भेटवस्तू ही ठेवलेली असते. गेल्या काही वर्षांमध्ये कामाच्या ठिकाणीही अशाच सँटाचा वावर पाहायला मिळतोय. कर्मचाऱ्यांमध्ये असणारं खेळीमेळीचं आणि तितकच सहज वातावरण, त्यांच्यातलं कामाच्या ठिकाणी असणारं नातं दृढ व्हावं आणि अर्थात प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंदाची झाक दिसावी यासाठी 'सिक्रेट सँटा'चं आयोजन केलं जातं. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचं नाव आल्यानंतर आता त्या व्यक्तीला भेट स्वरुपात नेमकं द्यायचं काय याच विचारात सध्या अनेकजण असतील. बरं भेटवस्तू काय, कशी आणि कोणत्या व्यक्तीला देणार याचा सारासार विचार केल्यानंतर काहीच सुचत नाहीये... असं म्हणत जर तुम्ही हत्यार टाकणार असाल तर थांबा. यंदाच्या 'सिक्रेट सँटा'साठी आम्ही देतोय तुमच्या खिशाला परवडतील आणि सहकाऱ्यांनाही आवडतील अशा भेटवस्तूंचे काही खास पर्याय.....  

2/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

ट्रेकिंग उपकरणं (Trekking equipments)-  आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी मिळाली तरीही शहरापासून पळ काढत ट्रेकिंग, हायकिंग करणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. ते नाही, तर नुसतं फिरणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. त्यामुळे अशाच एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्हाला आलं असल्यास अगदी दोनशे रुपयांपासून जास्त किंमतीची अनेक उपकरणं, बॅकपॅक, पाण्याची बाटली, टोप्या आणि असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे यावर्षीय हा पर्याय उत्तम ठरु शकतो. (छाया सौजन्य- कँपिंग थिंग्स)  

3/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

कलात्मक टी इन्फ्यूजर्स (Quirky Tea Infusers)-  डेस्कवर काम करणाऱ्यांना कामाच्या व्यापात कोणती गोष्ट दिलासा देत असेल तर ती म्हणजे चहा. ग्रीन टी, जॅस्मिन टी, आसामी टी, लेमन टी अशी कोणत्याही प्रकारची चहा पिण्याला अनेकांचीच पसंती असते. त्यामुळे एखादं कलात्मक आणि तितकच सुरेख असं टी इन्फ्युजर देण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. घरगुती उपकरणं मिळणाऱ्या एखाद्या चांगल्या दुकानात किंवा ऑनलाईन साईटवर तुम्हाला याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (छाया सौजन्य- अॅमेझॉन)   

4/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

स्पा कुपन्स (Spa Coupons)- जवळपास नऊ ते अकरा तास सलग काम केल्यानंतर कधी एकदा गाढ झोपतो, असा एकच विचार अनेकजण करत असतात. प्रवास, काम, दगदग आणि या साऱ्या थकवणाऱ्या जीनशैलीमध्ये स्वत:साठी वेळ काढणारी मंडळी तशी कमीच. पण, हरकत नाही, सँटाच्या रुपात सहकाराऱ्यांना एका खास भेटवस्तू देत तुम्ही त्यांना या खास वेळेची अनुभूती देऊ शकता. यासाठी एखादं सुरेख असं आयुर्वेदीक स्पाचं कुपन देत वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू देऊ शकता. यासाठी विविध दरांचे, उत्पादनांचे पर्यायही तुमच्यासाठी खुले आहेत. (छाया सौजन्य- टूर माय इंडिया)

5/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

स्टेशनरी (Stationary) - भेटवस्तू देण्यासाठी हा एक असा पर्याय आहे जो तुमच्या खिशालाही चटका लावत नाही आणि अर्थात ज्या व्यक्तीला तो दिला जातो त्याच्याकडून या वस्तूंचा हमखास वापरही होतो. त्यामुळे स्टेशनरी, तिसुद्धा काहीशी कलात्मक आणि रंगीबेरंगी रुपात आपल्या डेस्कवर असणं कोणलाही आवडेल. अनेक दुकानांमध्ये या साहित्याचे विविध पर्यात चांगल्या दरांमध्ये उलब्ध आहेत. पाचशे रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंच्या शोधात असाल तर हा पर्यात तुमच्यासाठी मदतीचा ठरु शकतो. (छाया सौजन्य- अॅमेझॉन)

6/6

Secret Santa 2018 : 'सिक्रेट सँटा' होऊन सहकाऱ्यांना द्या आकर्षक भेटवस्तू

ऑन द गो कॉ़फी मग (On the go Coffee mug)- दिवसभराच्या धकाधकीत एक कप कॉफी म्हणजे क्या बात. तुमच्या सहकाऱ्यांनाही सतत कॉफी पिण्याची सवय असेल तर नेहमीच्याच कॉफी मगपेक्षा त्यांना 'ऑन द गो कॉफी मग' देण्याला तुम्ही नक्की प्राधान्य द्या. हे म्हणजे अतिउत्तम.... अशीच प्रतिक्रिया सहकाऱ्याकडून मिळेल यातशंका नाही. (छाया सौजन्य- इंडियामार्ट)