Cigarette चे व्यसन व्यक्तीला पडलं महागात, संपूर्ण अंग पडलं पिवळं

Feb 03, 2021, 15:21 PM IST
1/5

मेडिकल रिपोर्ट्समध्ये झाला खुलासा

मेडिकल रिपोर्ट्समध्ये झाला खुलासा

डॉक्टरांनी या 60 वर्षांच्या व्यक्तीची तपासणी केली असता, त्याला कावीळ झाल्याचे उघड झाले. अहवालांच्या आधारे डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीला स्वादुपिंडामध्ये एक ट्यूमर होता. तो इतका मोठा झाला होता की, त्या व्यक्तीच्या पित्त नलिकांना ब्लॉक केले गेले. या कारणामुळे त्याच्या शरीरावरचा रंग पिवळा झाला. (प्रतीकात्मक फोटो)

2/5

सिगारेट प्यायलाने झाली अवस्था

सिगारेट प्यायलाने झाली अवस्था

जास्त सिगारेट ओढल्यामुळे या व्यक्तीच्या सेल्सचा आकार बराच वाढला होता. त्यामुळेच त्याची प्रकृती खालावू लागली. ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून मद्यपान आणि धूम्रपान करत आहे. (प्रतीकात्मक फोटो)    

3/5

ऑपरेशनच्या नंतर सामान्य झाला रंग

ऑपरेशनच्या नंतर सामान्य झाला रंग

शस्त्रक्रियेनंतर सध्या डॉक्टरांनी या व्यक्तीची गाठ काढून टाकली आहे. काही काळानंतर, त्याच्या शरीरावर रंग सामान्य झाला. डॉक्टरांनी हे स्पष्ट केले की जर त्याने आपली जीवनशैली सुधारली नाही तर त्याला वाचवणे फारच कठीण जाईल.

4/5

डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट

डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट

डॉक्टर म्हणतात की कावीळ झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचा आणि डोळ्याचा पांढरा भाग पिवळसर होतो. या व्यक्तीच्या शरीराचा रंग चमकदार पिवळ्या रंगाचा होता. (प्रतीकात्मक फोटो)  

5/5

चेन स्मोकर बनण्यासाठी एक झुरका पुरेसा

चेन स्मोकर बनण्यासाठी एक झुरका पुरेसा

लंडनमध्ये सिगारेट धूम्रपान करणार्‍यांवर केलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, सिगारेटचा एक पफ कोणत्याही व्यक्तीस चेन स्मोकर बनवू शकते.  सिगारेट ओढणारे दोन तृतीयांश लोक चेन स्मोकिंग करतात. (प्रतीकात्मक फोटो)