या एका उपायाने दूर करा केस आणि त्वचेच्या समस्या!

Mar 28, 2018, 16:33 PM IST
1/5

lifestyle changes can effect you skin and hair

lifestyle changes can effect you skin and hair

आजकाल जितके काम असते त्यापेक्षा ताणच जास्त असतो. नोकरी, ट्रफिक आणि आपली लाईफस्टाईल याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. परिणामी त्वचा आणि केसांचे आरोग्यही बिघडते. पण या सर्व समस्यांवर एक उपाय आहे तो म्हणजे एक कप कॉफी. रोज एक कप कॉफी पिणे स्वास्थ्यासाठी अत्यंत चांगले असते.

2/5

coffee have great contain of anti oxidant

coffee have great contain of anti oxidant

आरोग्याशिवाय एक कप कॉफी केस आणि त्वेचेसाठी फायदेशीर ठरते. कॉफीमुळे त्वचा तजेलदार होते. त्याचबरोबर केसगळती थांबते. कॉफीमध्ये मिनरल्स, अंटीऑक्सिंडेंट यांसारखे आवश्यक घटक असातात. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.  

3/5

coffee condition make your hair shine

coffee condition make your hair shine

केसांची वाढ होत नसल्यास कॉफीचा कंडीशनर म्हणून वापर करा. कंडीशनरमध्ये कॉफी मिसळून केसांवर लावा. 20-30 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केस मुलायम व चमकदार होतील.  

4/5

coffee scrub

coffee scrub

त्वचेला तजेलदार होण्यासाठी अंटीऑक्सिंडेंट खूप गरजेचे असतात. स्क्रब म्हणून कॉफीचा वापर करा. त्यासाठी कॉफीच्या पावडरमध्ये काही थेंब पाणी घालून पेस्ट बनवा आणि त्याने चेहऱ्याला स्क्रब करा. त्यामुळे तुमच्या त्वचेचे ओपन पोर्स बंद होण्यास मदत होईल. . (फोटो सौजन्य : ट्विटर/@seoanushka)

5/5

coffee colors your hair too

coffee colors your hair too

केसांना कलर करण्यासाठी कॉफी अत्यंत चांगला उपाय आहे. केसांना केमिकल्सयुक्त रंगापासून वाचवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये पाणी मिसळा आणि केसांना लावा. 10-15 मिनिटे ठेवून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.