मेळघाटात आढळले 'कलरफुल' बेडूक
नव्याने विविध आठ प्रजातीच्या "कलरफूल" बेडकांचे संशोधन
अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती : अमरावतीच्या गजानन वाघ या प्राध्यापकांचे मागील चार वर्ष केले संशोधन. सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या मेळघाटात मागील चार वर्षे संशोधन करून एका प्राध्यापकाने नव्या आठ प्रजातीच्या विविध रंगाच्या बेडकांचा शोध घेतला आहे. या मध्ये मेळघाटच्या जंगलात गजानन वाघ यांना विविध प्रजातिचे बेडक त्यांना आढळून आले.
ज्यामध्ये फर्ग्युसन टोड, हीलक्रिकेट फ्रॉग, पॅन्ट कलुओला, डोबसॉस बॉरोविंग फॉग या प्रजातीच्या बेडकांचे संशोधन करण्यात आले आहे. यापूर्वी २००५ मध्ये धुळतकर सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने मेळघाटात विविध आठ प्रजातीच्या बेडकांचे संशोधन केले होते.