बाळाचा विचार करताय? मग आत्ताच तुमच्या आहारात बदल करा

इच्छित वेळी गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही आत्ताच तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा 

| Jul 10, 2023, 19:36 PM IST

Pregnancy Planning Food: इच्छित वेळी गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही आत्ताच तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा 

1/5

बाळाचा विचार करताय? मग आत्ताच तुमच्या आहारात बदल करा

consume these foods at the time of planning baby

आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्याचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. कामाचा ताण, कौटुंबिक स्ट्रेस यामुळं महिलांच्या हार्मोन्सवर परिणाम ठरतो. याचा परिणाम महिलांच्या गर्भधारणेवरदेखील होतो. प्लानिंग केल्यानंतरही गर्भधारणा होण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. पण प्रेग्नंसी प्लान करत असताना आपलं शरीरही तंदुरस्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या डायटमध्ये या भाज्यांचा उपयोग करावा. 

2/5

बीट

consume these foods at the time of planning baby

बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आत्ताच तुमच्या आहारात बीटचा समावेश करा. कारण बीटमुळं शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. इतकंच नव्हे तर तुमच्या गर्भपिशवीपर्यंत रक्तप्रवाहही सुरळीत करतो. त्यामुळं तुम्हाला गर्भधारणा होण्यास कोणतीही अडचण येत नाही. 

3/5

भोपळ्याच्या बिया

consume these foods at the time of planning baby

भोपळ्याच्या आणि सूर्यफूलाच्या बीयांमध्ये ओमेगा-३चा उत्तम स्त्रोत असतो. या बियांचे सेवन केल्यास पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढण्यास मदत मिळे,. त्यामुळं तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर रोज भोपळ्याच्या बिया खाव्यात. 

4/5

डाळी

consume these foods at the time of planning baby

रोज तुमच्या आहारात डाळींचा समावेश करा. कारण कडधान्य आणि डाळींमध्ये हार्मोन्स बॅलेन्स करण्यास मदत होईल. 

5/5

जंक फूड टाळा

 consume these foods at the time of planning baby

गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना जंक फूड टाळा. आहारात पालेभाज्या, अंडी, फळे, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)