तांदळाच्या सेवनाने शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

तांदळात असलेल्या  पोषक घटकांंमुळे  पावसाळ्यात रोगप्ररतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. 

Jul 23, 2024, 16:53 PM IST

भात खाऊ नये किंवा भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, वजन वाढतं असे बरेच समज गैरसमज भाताबद्दल आहेत. 

1/9

पांढऱ्या रंगाच्या तांदळाचा भात हा शरीराला ऊर्जा प्रदान करतो. एंटीऑक्सिडेंट आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये मुबलक प्रमाणात असतात.   

2/9

कोकणपट्ट्यात भातशेती  प्रामुख्याने केली जाते. असं म्हणतात की, आजारी असलेल्या माणसाला भाताची पेज दिल्याने अशक्तपणा दूर होतो.     

3/9

भातामुळे शरीराला बरेच पोषक घटक मिळतात. अपचनाचा त्रास होत असल्यास मुगाची डाळ टाकून  भाताची खिचडी खावी, असं तज्ज्ञ सांगतात. खिचडी पचायला हलकी असते,त्यामुळे पोट खराब असेल तर भाताच्या खिचडीने आराम मिळतो.   

4/9

तांदळात मॅग्नीज, लोह आणि व्हिटॅमिन बी यांसारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्हाला हाडांचं आरोग्य सुधारायचं असेल तर आहारात भाताचा समावेश नक्की करा.   

5/9

कोकण पट्ट्यात आजारी पडल्यावर उकड्या तांदळाची पेज दिली जाते. अतिसार होत असल्यास तांदळाच्या पेजेत कोकम तेल टाकून प्यायल्याने पोटाला आराम मिळतो.   

6/9

पावासाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात जर तुम्हाला संधीवाताचा त्रास होत असेल तर, तुम्ही दिवसातून दोव वेळा तरी पेज प्यायल्याने हाडांचं आरोग्य सुधारतं.   

7/9

जर तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास तांदूळ सर्वात उत्तम पर्याय आहे. तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो.   

8/9

भाताचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होतं. तसंच भाताच्या पाण्यात पोषक घटक जास्त असतं. 

9/9

भाताच्या पाण्याने चेहऱ्यावर आणि केसांना मसाज केल्यावर त्वचेचा पोत सुधारतो. शरीरातील कोरडेपणा दूर होतो.