Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताचे वेदनादायक आणि भीषण वास्तव्य, आरडाओरडा...एकमेकांवर पडलेले लोक

Coromandel Train Accident Latest Update : ओडिशा रेल्वे अपघातातून वाचलेल्यांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर लोक असंवेदनशील आणि नि:शब्द झाले आहेत. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या अनेक वेदनादायी गोष्टी सांगितल्या आहेत. ही माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि बसत आहे.

Jun 03, 2023, 08:02 AM IST
1/9

Coromandel Train Accident : ओडिशातील बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 900 लोक जखमी झाले आहेत. हा आकडा वाढत आहे. 

2/9

वास्तविक, सुपरफास्ट रेल्वे कोरोमंडल एक्स्प्रेस तामिळनाडूतील चेन्नईहून पश्चिम बंगालमधील शालीमार स्थानकाकडे जात होती. ही घटना बहंगा बाजार स्थानकात काल सायंकाळी 7.20 च्या सुमारास घडली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरुन घसरली. मालगाडीचे अनेक डबे मालगाडीवर चढले.

3/9

हावडाहून जाणाऱ्या बेंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहनगा येथे रुळावरुन घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले. रुळावरून घसरलेले हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि तिचे डबेही उलटले.

4/9

कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्यानंतर मालगाडीला धडकले, त्यामुळे मालगाडीसाही अपघात झाला.

5/9

सध्या अप आणि डाऊन अशा दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ओडिशा सरकार मदतीसाठी जनरेटर आणि दिवे घेऊन अपघातस्थळी पोहोचले होते. एनडीआरएफच्या अनेक तुकड्या कार्यरत आहेत. 

6/9

कोरोमंडल रेल्वे रुळाचं एकूण नुकसान पाहता 3 जून 2023 या दिवसासाठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वेंचे मार्ग वळवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

7/9

भारतीय रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रल ते शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ती शालिमारकडे निघाली. खरगपूर विभागातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. 

8/9

हावडाहून जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहनगा येथे रुळावरुन घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले. रुळावरुन घसरलेले हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि तिचे डबेही उलटले.

9/9

 कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनने चेन्नईला जाणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही S5 बोगीतून प्रवास करत होतो. घटनेच्या वेळी मी माझ्या सीटवर झोपलो होतो. अचानक जोराचा धक्का बसला आणि बोगी उलटली. नंतर मी पाहिले की कोणाचे डोके नव्हते आणि कोणाचा हात किंवा पाय कापला गेला होता.