मिल्खा सिंगच्या नातवाने रचला इतिहास, वयाच्या 13 व्या वर्षी केला 'हा' पराक्रम

European golf championship: आता मिल्खा सिंग (Milkha singh) यांचे नातू हरजय मिल्खा सिंग (Harjai Milkha Singh) याने देखील वडील आणि आजोबांच्या मार्गावर चालत मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे आता त्याचं संपूर्ण गावात कौतूक होत असल्याचं दिसतंय.

Jun 03, 2023, 00:51 AM IST

Harjai Milkha Singh: दिवंगत धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांची भारतातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंमध्ये गगना केली जाते. मिल्खा सिंग यांचं जून 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे निधन झालं होतं. अशातच आता त्यांच्या नातवानं (Milkha Singh Grandson) मोठा पराक्रम गाजवला आहे.

1/5

आता मिल्खा सिंग यांचे नातू हरजय मिल्खा सिंग याने देखील वडील आणि आजोबांच्या मार्गावर चालत मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे आता त्याचं संपूर्ण गावात कौतूक होत असल्याचं दिसतंय.

2/5

हरजय मिल्खा सिंग याने स्कॉटलंडमध्ये आयोजित यूएसकिड्स गोल्फ युरोपियन चॅम्पियनशिपचे 13 वर्षांखालील विजेतेपद पटकावले आहे.  हरजयचे वडील जीव मिल्खा सिंग हे सुप्रसिद्ध गोल्फपटू आहेत. 

3/5

हा आपल्या आयुष्यातील महान क्षण आहे. ही ट्रॉफी दिवंगत आजी निर्मला मिल्खा सिंग आणि आजोबा सरदार मिल्खा सिंग यांना समर्पित.. त्याचा नातू असल्याचा मला अभिमान आहे. दोघंही हे जग सोडून कायमचे गेले, पण ते कुठेही असले तरी त्यांना माझा अभिमान वाटत असेल, असं हरजय मिल्खा सिंग म्हणतो.

4/5

जीव यांनी आपल्या गोल्फपटू मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. नातवाच्या या यशाबद्दल स्वर्गात आजोबा आणि आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू असतील, असं जीव यांनी म्हणलं आहे.

5/5

दरम्यान, मिल्खा सिंह यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चार आणि राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकलं होते. मिल्खा रोम ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत चौथ्या स्थानावर होते.