Made In India E Bikes : भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालायला 'या' दोन ई-बाईक्स सज्ज

पेट्रोलच्या सतत वाढत असलेल्या किंमतीमुळे ई-बाईक हा स्वस्त आणि उत्तम पर्याय सिद्ध होताना दिसतो आहे.

Aug 24, 2022, 11:08 AM IST

मुंबई : पेट्रोलच्या सतत वाढत असलेल्या किंमतीमुळे ई-बाईक हा स्वस्त आणि उत्तम पर्याय सिद्ध होताना दिसतो आहे. या मुद्द्याला लक्षात घेता, Corrit Electric ने भारतीय बाजारपेठेत Hover 2.0 आणि Hover 2.0+ या दोन स्लो- स्पीड ईलेक्ट्रिक बाईक्स लाँच केल्या आहेत. या बाईक्सच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सविस्तर जाणून घेऊया...

1/5

Hover 2.0 आणि Hover 2.0 Plus ची बॅटरी

Corrit Hover 2.0 या बाईकमध्ये 1.5 kWh बॅटरी आहे तर Corrit Hover 2.0+ मध्ये 1.8 kWh बॅटरी आहे. दोन्ही बाईक्स प्रति तास 25 किलोमीटर टॉप स्पीडसोबत येतात.

2/5

Hover 2.0 आणि Hover 2.0 Plus ची रेंज

Hover 2.0 या बाईकला सिंगल चार्चमध्ये 80 किलोमीटर पर्यंत चालवलं जाऊ शकतं. तसेच, Hover 2.0+ या बाईकला फुल चार्ज केल्यानंतर 110 किलोमीटर पर्यंत चालवलं जाऊ शकतं.

3/5

Hover 2.0 आणि Hover 2.0 Plus चे फीचर्स

Corrit Hover 2.0 आणि 2.0+ या ईलेक्ट्रिक बाईक्समध्ये कॉम्बिनेशन स्विच, लेटेस्ट इंस्ट्रमेंट क्लस्टर आणि लॉक सिस्टीम सारखे फीचर्स दिले आहेत. या दोन्ही बाईक्स मोबाईल फोन्सशी कॉम्पॅटिबल आहेत.

4/5

Hover 2.0 आणि Hover 2.0 Plus ची किंमत

एक्स शोरुम नुसार, Hover 2.0 ईलेक्ट्रिक बाईकची किंमत 79,999 रुपये आहे आणि Hover 2.0+ या ई-बाइकची किंमत 89,999 रुपये आहे.

5/5

Hover 2.0 आणि Hover 2.0 Plus

या दोन्हीही बाईक्सीची मॅनिफॅक्चरिंग ग्रेटर नोएडामध्ये Corrit Electric फॅक्टरीमध्ये केली जात आहे.