मुंबईत मतमोजणीची जोरदार तयारी, पाहा काही छायाचित्र

सध्या मतमोजणी केद्रांवर मत मोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

May 21, 2019, 16:39 PM IST

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. २३ मे रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या देशात  एक्झिट पोलच्या चर्चांना उधाण आले आहे. 

1/5

उमेदवारांसोबतच मतदारांमध्ये सुद्धा निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर सध्या मतमोजणी केद्रांवर मत मोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

2/5

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवडी येथे होणार आहे. न्यू शिवडी वेअर या प्रमुख मतमोजणी केंद्रात मतमोजणी पार पडणार आहे.  

3/5

मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सज्ज असून तब्बल ३ हजार सरकारी कर्मचा-यांना मतमोजणी ड्युटी सोपवण्यात आली आहे. मतमोजणीचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

4/5

सुरुवातील पोस्टल मतांची मोजणी होणार असून त्यानंतर इव्हीएम मतांची, व्हिव्हिपॅट मतांची मोजणी होईल. २३ तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

5/5

मुंबई जिल्हयातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदार संघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी विधानसभा निहाय १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार लोकसभा मतदार संघाच्या फेऱ्या होणार आहेत.