आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'या' चार नियमांत मोठे बदल, फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी

ICC New Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम आता आणखी कडक झाले आहेत. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी संबंधीत चार नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांमुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाची डोकेदुखी वाढणार आहे. 

| Jan 04, 2024, 21:42 PM IST
1/7

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने चार नियमात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेवर चांगलाच प्रभाव जाणवणार आहे. 

2/7

स्टम्पिंगचा डिआरएस घेतल्यास आता विकेट मागे कॅच घेतला गेला आहे का हे अंपायर तपासणार नाही. याआधी फिल्डिंग करणार संघ स्टम्पिंगसाठी अपील करायचा, स्टम्पिंग बरोबरच कॉट बिहाइंडही तपासला जात होता. 

3/7

यापुढे तिसरा अंपायर आता केवळ साइड ऑन रिप्ले पाहून फलंदाज बाद आहे की नाही याचा निर्णय देईल. 

4/7

सामन्यादरम्यान एखाद्या गोलंदाजाला निलंबित केल्यास त्याच्या जागी आलेला पर्यायी खेळाडू गोलंदाजी करु शकणार नाही

5/7

एखादा खेळाडू सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला, तर केवळ चार मिनिटचं खेळ थांबवला जाईल. 

6/7

तिसऱ्या अंपायरकडे गोलंदाजाच्या फ्रंट फूटबरोबरच सर्व प्रकारचे नो-बॉल तपासण्याचे अधिकार असणार आहेत.

7/7

दरम्यान बीसीसीआयनेही डेड बॉल आणि प्रत्येक षटकात दोन बाऊंसर टाकण्याचा नियम रणजी ट्रॉफी स्पर्धेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.