KL Rahul Athiya Shetty: लग्नानंतर राहुल अथिया वांद्रे इथं होणार शिफ्ट; 'हा' स्टार कलाकार असणार शेजारी!

केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात (Khandala) सात जन्माची लग्नगाठ बांधणार आहे.

Jan 10, 2023, 19:50 PM IST

KL rahul athiya shetty News: केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात (Khandala) सात जन्माची लग्नगाठ बांधणार आहे.

1/5

kl rahul athiya shetty marriage: क्रिकेट (Cricket) आणि बॉलिवूड (Bollywood) यांचं खूप जुनं नातं आहे. मैदानावर चौकार आणि षटकार मारणारे हे स्टार क्रिकेटर्स बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींच्या सौंदर्य, स्टाईल आणि ग्लॅमरसमोर क्लीन बोल्ड झाले आहेत. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील काही जोडपी लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली. याच भल्या मोठ्या यादीत आता केएल राहुल (kl rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya shetty) यांचं नाव जोडलं आहे. (cricket kl rahul athiya shetty going to live at bandra after marriage near ranbir kapoor alia bhatt marathi news)

2/5

भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या लग्नामुळे (kl rahul athiya shetty marriage) चर्चेत आहे. राहुल गेल्या काही दिवसांपासून सुनिल शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीला डेट करत होता. त्यानंतर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या लग्नाची तारीख (kl rahul athiya shetty marriage Date) आणि ठिकाण याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.  

3/5

केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात (Khandala) सात जन्माची लग्नगाठ बांधणार आहे. इथंच दोघं एकमेकांशी पवित्र बंधनात बांधले जातील. दोघांचा विवाहसोहळा अतिशय भव्य असणार असल्याची शक्यता आहे. या सोहळ्यात अनेक क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

4/5

लग्नानंतर दोघंही वांद्र्याच्या (Bandra) फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचा फ्लॅट रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या पाली हिलच्या वांद्रे येथील घराजवळ आहे. त्यामुळे आता केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या नावाची चर्चा असल्याचं पहायला मिळतंय.  

5/5

दरम्यान, मेंहदी सोहळा, लग्न सोहळ आणि संगीत असा भरगच्च आणि शाही थाट करण्यासाठी अथिया आणि राहुलच्या घरी लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी आता बॉलिवूडचा लाडका (Sunil Shetty) अण्णाच्या लेकीचं लग्नासाठी धावपळ करत असल्याचं दिसतंय. अशातच आता सोशल मीडियावर (Social Media) देखील चर्चेला उधाण आलंय.