2024 मध्ये कोण मोडणार क्रिकेटचे हे 5 महाविक्रम!

क्रिकेटमध्ये असे 5 रेकॉर्ड आहेत जे या वर्षी मोडणे जवळपास निश्चित आहे. बाबर आझमला विराट कोहलीला मागे सोडण्याची संधी आहे, तर राशिद टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो.

Jan 04, 2024, 14:32 PM IST
1/7

क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी अनेक विक्रम झाले आणि मोडले सुद्धा. चाहत्यांना नवीन वर्षात म्हणजेच 2024 मध्येही क्रिकेटचा संपूर्ण डोस मिळणार आहे. यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. T20 विश्वचषकाचे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. या वर्षात क्रिकेटचे 5 मोठे विक्रम मोडीणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचा विक्रमही धोक्यात आला आहे.  

2/7

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान नवीन वर्षात आपल्या नावावर मोठे विक्रम नोंदवू शकतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने 104 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3485 धावा केल्या आहेत. सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहलीच्या मागे आहे.   

3/7

विराटच्या नावावर 4008 तर रोहित शर्माच्या 3853 रन्सची नोंद  झाली आहे. मार्टिन गप्टिलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3531 रन्स केले. हे दोन्ही खेळाडू  गेल्या एक वर्षापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत या दोन सुपरस्टार्सला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची सुवर्णसंधी बाबरकडे आहे. पाकिस्तान संघ यावर्षी 25 टी-20 सामने खेळणार आहे. या काळात बाबरला विराट आणि रोहितला पराभूत करण्याची सुवर्णसंधी आहे.  

4/7

राशिदला ब्राव्होचा विक्रम मोडण्याची संधी : अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. राशिदने 410 टी-20 सामन्यात 556 विकेट घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहेत ज्याने 564 सामन्यांमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर यंदाच्या आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळून ब्राव्होचा विक्रम मोडू शकतो.  

5/7

700 च्या ऐतिहासिक आकड्यापासून 10 विकेट दूर : इंग्लंडचा फास्ट गोलंदाज जेम्स अँडरसन यावर्षी कसोटीत 700 विकेट्स घेऊ शकतो, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. अँडरसनने 183 टी-20 सामन्यात 690 विकेट घेतल्या आहेत. 700 चा टप्पा गाठण्यासाठी त्यांना 10 विकेट्सची गरज आहे. भारताविरुद्धच्या सिरिज मध्ये अँडरसनने 19 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला तर तो दिग्गज शेन वॉर्नला मागे टाकेल. शेन वॉर्नच्या नावावर टोटल 708 विकेट आहेत.   

6/7

T20 मध्ये नवीन टीम चॅम्पियन होऊ शकतो : यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. यावेळी टी-२० विश्वचषकात नवा चॅम्पियन मिळू शकतो. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांना विश्वविजेते बनण्याची संधी आहे.  

7/7

ऑस्ट्रेलियाला तिन्ही ट्रॉफी जिंकण्याची संधी  : सध्याचा वनडे विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाकडे एका वर्षात 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ऑस्ट्रेलिया टीमने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडेय विश्वचषक जिंकला आता या वर्षीचा T20 विश्वचषक जिंकून, एकाच वेळी तीनही ICC ट्रॉफी जिंकणारा तो जगातील पहिला संघ बनू शकतो.