तुमच्या पगारावर किती Personal Loan मिळणार? कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

Personal Loan : नुकत्याच Bank Bazar नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये  पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचा आकडा मोठा असल्याची बाब समोर आली.   

Jan 04, 2024, 12:51 PM IST

Personal Loan : जीवनातील काही गरजा भागवण्यासाठी आणि त्या गरजांसोबतच जीवनशैली सुधारण्यासाठी अनेकदा काही अशा वाटा निवडल्या जातात जिथं आर्थिक हातभार लागावा म्हणून कर्ज घेतलं जातं. अनेक बँका, पतसंस्था ही सुविधा पुरवतात. 

1/7

कर्ज मिळवण्याची प्रक्रिया

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

हल्ली कर्ज मिळवण्याची प्रक्रियासुद्धा इतकी सोपी झाली आहे, की काही कागदपत्रांची पूर्तता करतात दुसऱ्या क्षणी तुमच्यापर्यंत ही आर्थिक मदत पोहोचते. पण, कर्ज घेण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं.   

2/7

किती पगारावर किती कर्ज मिळतं?

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan साठी अर्जदार व्यक्तीकडे कर्जासाठी निश्चित स्त्रोत असणं करजेचं असून, किमान 30 हजार रुपयांच्या पगारावरच कर्ज मिळतं. निवृत्त व्यक्तींना कर्ज देण्यात बँक दोनदा विचार करते.   

3/7

कर्ज का घेताय ?

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan घेण्यापूर्वी तुम्ही ते का घेत आहात हेसुद्धा लक्षात ठेवा. कर्ज तुमची संपूर्ण गरज भागवेल का या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच द्या.   

4/7

कर्ज किती हवंय?

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan चा अर्थच लोन अॅग्रिमेंट करणं आणि गरजेपेक्षा जास्त कर्ज न घेणं सुचवतं. कोणा कर्जदाराला शोधण्यापर्वी तुम्हाला नेमकं किती कर्ज हवंय हे लक्षात घ्या.   

5/7

कर्जाचा कालावधी

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan घेण्यापूर्वी कर्ज किती काळासाठी घेतलं जात आहे हे लक्षात घ्या. सहसा या कर्जाचा कालावधी 12 महिने ते 60 महिने इतका असतो. ईएमआय कमी ठेवायचा असल्यास जास्त अवधीसाठीचं कर्ज निवडा.   

6/7

तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे?

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही स्वत:चा क्रेडिट स्कोअर जाणून घ्या. 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असणं पर्सनल लोन मिळणं आणखी सोपं करतं.   

7/7

कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र कोणते?

how to apply for personal loan for low interetst rate bank emi

Personal Loan साठी अर्ज करण्याआधी तुम्ही सर्व कागदपत्र गोळा करून घ्या. यामध्ये आयडी, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र आणि आयटीआर रिटर्न डिक्लरेशनचा समावेश आहे.