भुवनेश्वर कुमार ते शिखर धवन, 'या' 5 खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद?

| Feb 29, 2024, 20:14 PM IST
1/7

ईशान-श्रेयसला डच्चू

बीसीसीआयने 28 जानेवारीला टीम इंडियाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला आहे. चार ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली असून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू देण्यात आला आहे. बीसीसीआयशी पंगा घेणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय.

2/7

नव्या खेळाडूंची एन्ट्री

बीसीसीआयने ईशान किशन, श्रेयस अय्यर यांच्या जागी यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, केएस भरत या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे. पण पाच दिग्गज खेळाडू असे आहेत ज्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. 

3/7

चेतेश्वर पुजारा

टीम इंडियाची भिंत अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजाराला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलं आहे. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा डोंगर उभा केला. रणजी ट्रॉफी स्पर्धेतल्या गेल्या पाच डावात पुजाराने 2 शतक ठोकले आहेत. याआधी त्याने दुहेरी शतकही केलं. पण यानंतरही कसोटी संघात त्याचं पुनरागमन होऊ शकलं नाही.

4/7

अजिंक्य राहाणे

टीम इंडिया कसोटी संघात उपकर्णधारापासून कर्णधारापर्यंत अजिंक्य रहाणेने सर्व भूमिका बजावल्या. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आयपीएलच्या गेल्या हंगामात आक्रमक खेळीच्या जोरावर रहाणेची टीम इंडियात वर्णी लागली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने दमदार कामगिरीही केली. पण वेस्टइंडिज दौऱ्यानंतर तो संघाबाहेर आहे. आता बीसीसीआयने त्याा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही बाहेर रस्ता दाखवलाय.

5/7

शिखर धवन

बीसीसीआयने स्टार सलामीवीर शिखर धवनलाही सेंट्रल कॉन्ट्रेक्टमधून बाहेर केलं आहे. 2023 पासून बीसीसाआयकडून शिखर धवनकजे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. आता टीम इंडियाचं त्याचं पुनरागमन जवळपास अशक्य आहे. शिखर धवनला एशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धेतूनही बाहेर ठेवण्यात आलं होतं. 

6/7

भुवनेश्वर कुमार

टीम इंडियात मोहम्मद शमीच्या जोडीला भुवनेश्वर कुमारने एक काळ गाजवला होता. अचूक टप्पा आणि स्विंगच्या जोरावर भुवनेश्वरने भारतासाठी अनेक सामने जिंकून दिले. पण गेल्या काही काळापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. आता टीम इंडियात पुन्हा जागा मिळणं जवळपास अश्यक आहे. 

7/7

उमेश यादव

भुवनेश्वर कुमार प्रमाणेच वेगवान गोलंदाज उमेश यादवही बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर झालाय. गेल्या वर्षी उमेश यादवचा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला होता. पण नव्या करारात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. उमेश यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे आता बंद झालेत.