नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनात

Team India Batter Wedding : 27 जुलैपासून टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही केलीय. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज लग्नबंधनात अडकला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत. 

| Jul 19, 2024, 19:14 PM IST
1/7

नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताचा स्टार फलंदाज अडकला लग्नबंधनात

2/7

भारतीय  क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज दीपक हूडा लग्नबंधनात अडकला आहे. तब्बल 9 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपकने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलंय. लग्नाचे फोटो दीपक हुडाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3/7

दीपक हुडाची पत्नी हिमाचल प्रदेशमध्ये राहाणारी आहे. दीपक हुडाने फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिला आहे. यात त्याने म्हटंलय '9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वन आणि आमच्यातील वाढत्या प्रेमाने हा सुंदर दिवस पाहायल मिळालाय' 

4/7

दीपक हुडाच्या लग्नात त्याचे मित्र, कुटुंब आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. कुटुंब आणि मित्रांच्या आशिर्वादाने आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच त्याने सर्वांचे आभारही मानले आहेत. 

5/7

दीपक हूडाच्या नव्या इनिंगला अनेक क्रिकेटर्सने शुभेच्या दिल्या आहे. शिखर धवनने दोघांना खुप शुभेच्छा असं म्हटलं आहे. तर युजवेंद्र चहलने अभिनंदन असं म्हटलं आहे. माजी क्रिकेटर इरफान पठाणनेही दोघांना शुभेच्छा दिल्यात. तर अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबीने अभिनंदनाची पोस्ट शेअर केलीय.

6/7

दीपक हूडाने टीम इंडियासाठा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण  केलंय. दहा एकदिवसीय सामन्यात हूडाने 153 धावा केल्यात. तर 21  टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 368 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 9 विकेटही जमा आहेत.

7/7

दीपक हूडाकडे आयपीएलचा मोठा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो तब्बल 118 सामने खेळला असून यात त्याने 1465 धावा केल्या आहेत. तर 10 विकेट घेतल्या आहेत. 2024 च्या आयपीएल हंगामात दीपक हूडाने लखनऊ सुपर जायंटसचं प्रतिनिधित्व केलं.