विराट कोहलीला लागली 110 कोटी रुपयांची लॉटरी, ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर केवळ मैदानावरच नाही तर कमाईच्या बाबतीतही अव्वल आहे. एका माणसाच्या वर्षांचा जितका पगार असोत तितकी विराट कोहलीची एका दिवसाची कमाई आहे. आता यात आणखी भर पडली आहे. 

| Feb 08, 2024, 16:32 PM IST
1/7

टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव जगातली सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये घेतलं जातं. कोहलीची एकूण संपत्ती 127 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 1046 कोटी रुपये इतकी आहे. 

2/7

विराट वर्षाला 15 कोटी रुपयांची कमाई करतो. त्याची महिन्याची कमाई आहे  1 कोटी 25 लाख रुपये, तर आठवड्याला तो 28 लाख 84 हजार 615 रुपये कमतो. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई आहे 5 लाख 76 हजार 923 रुपये इतकी.  

3/7

आता यात आणखी भर पडली आहे. विराट कोहलीने Puma कंपनीबरोबर मोठा करार केला आहे. विराटने 8 वर्षांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा करार केला आहे. 

4/7

कोणत्याही एका कंपनीबरोबर इतक्या वर्षांचा करार करणारा विराट कोहली हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि एमएसम धोणीने 100 कोटींचा करार केला होता. 

5/7

याआधी पुमा कंपनीने धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल,  फुटबॉलपटू थियरे हेनरी, ओलिवर जिराड यांच्याशी करार केला होता. या यादीत आता भारताचा स्टार क्रिकेटपटू विराटचं नाव जोडलं गेलं आहे. 

6/7

पुमा कंपनीसाठी अनेक महान खेळाडूंनी जाहीरात केल्या आहेत, यात कंपनीने मला संधी दिली याबाबत मला गर्व आहे अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे. 

7/7

बीसीसीआयकडून विराटला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय कसोटी, एकदिवसीय आणि टी20 फॉर्मेनुसार त्याला प्रत्येक सामन्याचे वेगळे पैसै मिळतात.