घराजवळ कबुतरं गर्दी करत असतील तर सावधान! आताच घ्या काळजी

Beware of Pigeon Droppings : कबुतर पाळताय तर सावधान कारण त्याच्यापासून मानवी आरोग्याला विविध आजारांचा धोका आहे. कबुतरांना पाळणे, खायला घालणे, लाड करणे, सर्वांना आवडते. पण असे करत असाल तर सावधान. या कबुतरांमुळे फुप्फुसाचे विकार व ऍलर्जीची होण्याची शक्यता आहे. 

Feb 08, 2024, 17:55 PM IST

 

 

1/7

कबुतर पाळताय तर सावधान..!

कबुतरांच्या जवळ राहिल्यास तुम्हाला अनेक प्राणघातक रोग होऊ शकतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे तुमचे फुफ्फुस खराब होऊ शकतात.   

2/7

कबुतरांनमुळे कोणता आजार होतो?

ज्याठिकाणी कबूतरांची संख्या जास्त अस्ते तिथे एक विचित्र वास येतो. या कबुतरांना फक्त त्या ठिकाणी बसणे आवडते जिथे त्यांनी विष्ठा केली आहे. जेव्हा ही विष्ठा सुकते तेव्हा त्याची पावडर बनते. तसेच जेव्हा कबूतर पंख फडफडतात तेव्हा बीट पावडर श्वासाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. यामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार होतात.  

3/7

फुफ्फुसाच्या रोगाचा धोका :

जे लोक कबुतराच्या विष्ठा आणि पिसाभोवती राहतात आणि त्यांच्या थेट संपर्कात येतात त्यांना फुफ्फुसाच्या रोगाचा धोका जास्त असतो. पिसांद्वारे पसरणारे जिवाणू आणि विष्ठा श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचतात.   

4/7

पक्ष्यांच्या विष्ठामुळे फुफ्फुसांवर होणारा परीणाम :

त्यानंतर, हे प्रतिजन शरीरात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करतात ज्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. यामुळे फुफ्फुसांना मोठी हानी होते. तज्ञांनुसार एक कबूतर एका वर्षात 11.5 किलो विष्ठा करतो.   

5/7

पक्ष्यांच्या विष्ठा ठरतं आजाराचे कारण :

विष्ठा सुकल्यानंतर त्यामध्ये परजीवी वाढू लागतात. विष्ठेमध्ये तयार होणारे परजीवी हवेत विरघळून संसर्ग पसरवतात. अतिसंवेदनशीलता न्यूमोनायटिस अतिशय धोकादायक आहे. ज्यामुळे तीव्र असल्यास, श्वास घेण्यात अडचण, खोकला, ऑक्सिजन ड्रॉप, सांधेदुखी अशी लक्षण दिसून येतात.  

6/7

हिस्टोप्लाज्मोसिसचे लक्षणे :

हे रोग हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सिटाकोसिस, साल्मोनेला आणि लिस्टरिया म्हणून ओळखले जातात. या आजाराची लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात. खोकला, कोरडा खोकला आणि थोडासा श्वासोच्छवासाचा त्रास, हळूहळू वजन कमी होणे, सौम्य ताप आणि अंगदुखी, अशी लक्षण जाणवायला लागतात.  

7/7

दाणे टाकण्यावर बंदी :

दाणे टाकण्यावर बंदी मुंबईसारख्या शहरांतही कबुतरांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल वारंवार चिंता व्यक्त होत असते. 2001 मध्ये अनेक देशांनी कबुतरांमुळे होणाऱ्या घाणीविरुद्ध मोहीम उघडली होती.