कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कर्फ्यूपूर्वी अहमदाबादच्या बाजारात मोठी गर्दी

Nov 21, 2020, 12:32 PM IST
1/5

शुक्रवारी दुपारी बाजारात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोकं सोशल डिस्टंसिंगचे कोणतेही नियम पाळताना दिसत नव्हते. 

2/5

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांंमुळे अहमदाबादमध्ये कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजेपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू (Curfew) लागू करण्यात आला आहे.

3/5

अहमदाबादमध्ये आतापर्यंत एकूण 46,022 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तरी देखील लोकं कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीयेत.

4/5

देशात कोरोनाचे रुग्ण आता कमी प्रमाणात पुढे येत असले तरी देखील कोरोनाचा धोका कायम आहे. जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही तोपर्यंत निष्काळजी राहू नका असं देखील पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं होतं.

5/5

राज्य सरकारकडून महत्त्वाचं पाऊल

राज्य सरकारकडून महत्त्वाचं पाऊल

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देखील लोकं बाहेर पडत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाची पाऊल उचलली जात आहेत.