तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताहात! ही बातमी वाचवेल तुमची लाज आणि लाखो रूपये!

Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?  

May 31, 2023, 18:51 PM IST
1/7

पैशाच्या जितक्या वाटा तयार होतात, तितक्याच प्रमाणात त्यावर डल्ला मारणारे वाटमारेही बनतात. ऑनलाईन किंवा डिजिटल जगही त्याला अपवाद नाही. जिथं उच्चशिक्षित, तरूण मंडळीही या ई-जाळ्यात अडकतायत तिथं आधीच्या पिढीतील लोक, वयोवृद्ध, ग्रामीण जनता यांचा कसा पाड लागणार?   

2/7

3/7

भारतातील 24 ते 37 वयोगटातील तरुणाई ई-घोटाळ्यांना अधिक बळी पडते.   

4/7

वय वर्ष 60 च्या पुढील वृद्ध हे ओटीपी स्कॅममध्ये अडकण्याचे प्रमाण मोठे आहे  

5/7

ई-घोटाळेबाजांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारे 73 टक्के पुरुष अशा प्रकरणात पैसे गमावतात.  

6/7

भारतातील 48 टक्के ग्राहक ई-घोटाळ्याच्या प्रकरणांना प्रतिसाद देतात. त्यातील 31 टक्के लोक यात अडकतात आणि पैसा देतात.   

7/7

अज्ञातांकडून येणाऱ्या फोन कॉलना प्रतिसाद देणारे लुबाडले जाण्याची सर्वाधिक शक्यता असते.