पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा! सायबेरियात नरकाचे द्वार... 40 हजार वर्ष जुन्या रहस्यमयी खड्ड्याचा आकार वाढतोय

रशियातील या महाकाय खड्डा नरकाचा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. 

| Sep 03, 2024, 19:01 PM IST

Siberia Permafrost : रशियाच्या सायबेरियन भागात असलेला महाकाय खड्डा पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे.  40 हजार वर्ष जुन्या रहस्यमयी खड्ड्याचा आकार वाढतोय.  हा 282 फूट खोल असा रहस्यमयी खड्डा आहे. हा खड्डा 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखला जातो. रशियातील सर्वात जुने खुले विवर आहे. 

1/8

सायबेरियातील 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाचा खड्डा  जगातील सर्वात मोठ रहस्य मानले जात. या खड्ड्याचा आकार वाढत आहे.  

2/8

या खड्ड्याच्या आकार वाढत आहे. 1960 मध्ये जेव्हा पहिल्यांदा उपग्रहावरून याचे फोटो काढले तेव्हा या खड्ड्याचा आकार खूपच लहान होता. 2018 मध्ये या खड्ड्याचा आकार  तीन पटीने वाढला आहे. NASA याचे फोटो शेअर केले आहेत.   

3/8

वर्षानुवर्षे या खड्ड्यात जमा झालेला नैसर्गिक गॅस (Natural Gas) बाहेर पडत आहे. हा गॅस खड्ड्याबाहेर पडताना स्फोटासारखा आवज येत आहे.   

4/8

सातत्याने येथील जमिनीखाली गोठलेला बर्फ वितळू लागला आणि येथे मोठा दलदलयुक्त खड्डा तयार झाला आहे. 

5/8

हा खड्डा  0.8 चौरस किलोमीटर आकाराचा आहे. याचा आकार  145 फुटबॉल मैदाने सामावू शकतील इतका मोठा आहे. 

6/8

पर्माफ्रॉस्ट म्हणजे जेथे जमीन, माती कोट्यावधी-अब्जावधी वर्षापासून हिमाच्छादित वातावरणात गोठलेली असते.  

7/8

 40 हजार वर्षांपासून सायबेरियातील खड्यांमधुन येणाऱ्या भयानक आवाजांचे गूढ अखेर उकललं आहे.

8/8

 सायबेरियात जगातील सर्वात मोठा पर्माफ्रॉस्ट खड्डा आहे. जगभरातील संशोधक येथे सातत्याने संशोधन करत आहेत.