close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Cannes 2019 : रेड कार्पेटवर दीपिका...

May 17, 2019, 13:01 PM IST
1/6

झगमगत्या दुनियेतील सर्वांत प्रसिद्ध 'कान' फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलसाठी भारतीय अभिनेत्रींनीही त्यांच्या जबरदस्त अदांनी 'कान'च्या रेड कार्पेटवर एन्ट्री केली आहे. cannes 2019 मध्ये दीपिकाच्या रेड कार्पेट लुकने सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

2/6

मेट गाला २०१९ नंतर दीपिकाने पुन्हा एकदा 'Cannes 2019'मध्ये आपल्या अदांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 

3/6

७२व्या 'कान फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका लॉग्न टेल गाउनमध्ये रेड कार्पेटवर उतरली होती.

4/6

दीपिकाने डिझायनर पीटर डुंडास यांनी डिझाइन केलेला काळ्या आणि क्रिम रंगाचा गाउन परिधान केला होता. 

5/6

या गाउनसोबत तिने हाय पोनी टेल, हिल्स, ड्रॉप ड्रॅग्लर ज्वेलरी, डोळ्यांचा भडक मेकअप असा संपूर्ण साजेशा गेटअप साकारत तिने रेड कार्पेटवर नेहमीप्रमाणे यंदाही आपला जलवा कायम ठेवला.

6/6

दीपिकाच्या रेड कार्पेट लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.