'या' ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?

ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे. 

| Jul 20, 2024, 22:18 PM IST

Diamonds On Mercury Planet: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. असाच एक रहस्यमयी खजिना ब्रम्हांडात सापडला आहे. अंतराळात एक असा ग्रह सापडला आहे. या ग्रहाभोवती  15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर आहे. नविन संशोधनात हा खुलासा झाला आहे. 

1/7

बुध ग्रहावर ब्रम्हांडातील सर्वात मोठा खजिना असल्याचा दावा नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून करण्यात आला आहे. 

2/7

बुध ग्रहावरील हिऱ्यांचा खजिना पृथ्वीवर आणणे अशक्य आहे.  बुध ग्रहाचे तापमान कमाल दिवसा 800 °F (430 °C) इतके असते. हिरे खूप खोलवर आहेत.     

3/7

 बुध ग्रहाबाबतचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.  बुध ग्रहाच्या निर्मितीच्या काळापासूनचे थर दाखवण्यात आले आहेत. यामध्ये बुध ग्रहावर 15 किलोमीटर जाडीचा डायमंड लेयर दिसत आहे.

4/7

 नासाच्या मेसेंजर मिशनने याचे संशोधन केले आहे. बुध ग्रहाच्या पृष्ठभागावरील गडद रंग ग्रेफाइट म्हणून ओळखले होते. जे कार्बनचे एक रूप आहे.  

5/7

बुध ग्रह अनेक रहस्यांनी भरलेला आहे. सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्याचे चुंबकीय क्षेत्र आहे.  

6/7

बुध ग्रहावर 9 मैल जाडीचा म्हणजेच 14.48 किलोमीटर रुंद हिऱ्याचा थर आढळून आला आहे.  

7/7

 बुध ग्रहाच्या पृष्ठभागाच्या शेकडो मैल खाली हिऱ्यांचा जाड थर असू शकतो असा दावा करण्यात आला आहे.