Corona Patient Diet : नाष्टा ते जेवणापर्यंत कोरोनाबाधिताने काय खावं?

Apr 26, 2021, 17:24 PM IST
1/5

कोरोनाबाधितांनी शिळ अन्न खाणं टाळावं

कोरोनाबाधितांनी शिळ अन्न खाणं टाळावं

कोरोनाबाधित रूग्णांनी स्वस्थ आणि संतुलित डाएटचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट, फॅट आणि हाय वॅल्यू प्रोटीनची मात्रा सर्वाधिक आहे. सोबतच एंटीऑक्सिजेंट आणि विटामिन खासकरून विटामीन सी आणि डीचं सेवन अधिक करावं. 

2/5

डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करावा

डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करावा

-एनर्जी लेवल आणि इम्युनिटीसोबतच रूग्णांची ताकद वाढणं देखील गरजेतं आहे. नाचणी, ओट्सचे सेवन अधिक करावे. तसेच चिकन, मासे, अंडी, पनील सोया, सुखा मेवा यांमधून प्रोटीन अधिक प्रमाणात मिळते. त्याचे सेवन करावे. अक्रोड, बदाम, ऑलिव ऑयल, तेलाचा वापर करावा. 

3/5

जेवणात थोडा आमचूर पावडरचा वापर करावा

जेवणात थोडा आमचूर पावडरचा वापर करावा

अनेक कोरोनाबाधित रूग्णांमध्ये चव आणि वास याची कमतरता जाणवते. अशावेळी भोजनात आमचूर पावडरचा वापर करावा. तसेच कोरोनाबाधित रूग्णाला अतिशय सॉफ्ट पदार्थ खाण्यात द्यावेत.

4/5

ब्रेकफास्ट ते डिनरपर्यंत काय खावं?

ब्रेकफास्ट ते डिनरपर्यंत काय खावं?

ब्रेकफास्ट - पोहा/बेसनाचा चीला/रव्याचा उपमा/भाज्यांसोबत सुंदर शेव/इडली/अंड्याचं फक्त सफेद /हळद घातलेलं दूध  दुपारच्या जेवणात - राजगिरी, नाचणी या मल्टी ग्रेन पिठापासून तयार झालेली भाकरी, भात, व्हेज पुलाव, खिचडी, डाळ, हिरव्या पालेभाज्या, दही आणि सलाड  संध्याकाळी -   आलं घालून केलेली चहा, चिकन सूप इम्युनिटी वाढवते.  डिनर में-  नाचणी, राजगिऱ्यापासून तयार केलेली भाकरी, सोयाबीन, पनीर, चिकन यांचा समावेश हवा

5/5

कोरोनामुक्त झाल्यानंतर काय खावे

कोरोनामुक्त झाल्यानंतर काय खावे

एकदा तुम्ही कोरोनावर मात केल्यावर आणि पूर्ण बरे झाल्यानंतर काही काळ थकवा जाणवेल. त्यावेळी सगळी फळं, कोमट पाणी, लिंबू पाणीचं सेवन करावं.