दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये राहा आणि नंतर....; लग्नाआधी डिंपल कपाडियाने जावई अक्षयला दिला होता अजब सल्ला

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे लोकप्रिय कपलपैकी एक आहे. ते दोघे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत राहतात. अक्षय आणि ट्विंकल हे त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलनं तिच्या आणि अक्षयच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. 

| Sep 01, 2023, 17:22 PM IST
1/7

ट्विक इंडिया शोमध्ये मसाबा गुप्ताची हजेरी

नीना गुप्ता यांची लेक आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्तानं या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

2/7

लिव्ह-इश रिलेशनशिपवर चर्चा

यावेळी ट्विंकल आणि मसाबानं लिव्हइन रिलेशनशिपविषयी चर्चा केली. 

3/7

मसाबाचा आई नीना गुप्ताविषयी खुलासा

मसाबानं खुलासा केला की 'तिची आई तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत तिला लिव्ह-इन मध्ये राहण्यास नकार देत होती. तिचा पूर्णपणे विरोध होता.'

4/7

ट्विंकल खन्नानं केला धक्कादायक खुलासा

ट्विंकल खुलासा करत तिची आई याविषयात पूर्णपणे विरुद्ध आहे, असं म्हणाली. याविषयी सांगित ट्विंकल म्हणाली की 'जेव्हा माझ्या पतीने सांगितलं की त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे, तेव्हा माझी आई त्याला म्हणाली, तुम्ही दोन वर्षे एकत्र राहून पहा. जर त्यानंतरही तुम्हाला लग्न करावंसं वाटलं तर निर्णय घ्या.'

5/7

आई डिंपल कपाडीयानं दिला होता सल्ला

'मी लग्न केलं आहे आणि लग्नाचा अनुभव कसा असतो हे मला नीट ठाऊक आहे', असं म्हणतं डिंपल कपाडिया यांनी दिला होता ट्विंकलला सल्ला

6/7

आई-वडील एकत्र राहत असते तर आयुष्य वेगळं असतं.

'जर माझे आई-वडील सोबत राहत असते तर मी सतत काम करत राहिले असतो का, असा मला कधीकधी प्रश्न पडतो. कदाचित केलं नसतं. मला माझ्या आईनेच लहानाचं मोठं केलं. त्यामुळे बरीच वर्षे मला पुरुषप्रधान सिस्टिम काय असते याविषयी काहीच माहीत नव्हतं. कारण मी स्वत: पुरुषप्रधान कुटुंबात नव्हते'. 

7/7

अखेर केलं लग्न

ट्विंकल आणि अक्षयनं 2001 मध्ये लग्न केलं असून त्याना दोन मुलं आहेत. (All Photo Credit : Twinkle Khanna/ Masaba Gupta Instagram)