मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट

Jun 19, 2018, 14:27 PM IST
1/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

जर तुम्ही कार खरेदीचा विचार करताय तर हीच योग्य वेळ आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती आपल्या नव्या कारवर बंपर डिस्काऊंट देतेय. जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काऊंट दिला जात आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या मारुतीच्या शोरुममध्ये जाऊन चौकशी करु शकता.

2/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

ऑल्टो ८०० - मारुतीची अॅफॉर्डेबल कार ऑल्टो ८००वर ३० हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. मात्र हा डिस्काऊंट कॅश डिस्काऊंट आहे. याशिवाय कंपनीकडून २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर तुम्ही दोन्ही ऑफर एकत्रित करुन पाहाल तर मारुतीच्या या लो प्राईज कारवर ५५ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो.

3/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

ऑल्टो के१० - ८०० सीसी सेगमेंटमध्ये पॉवरफुल कार ऑल्टो के १०च्या मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दोन्हीवर कंपनीकडून डिस्काऊंट  दिला जातोय. मॅन्युअल ट्रान्समिशनवर २२ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय आणि एएमटी व्हर्जनवर २७ हजारांचा डिस्काऊंट दिला जातोय. याशिवाय तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनवर ३० हजार आणि एएमटी ट्रान्समिशनवर ३५ हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जातोय.

4/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

मारुती वॅगानार - मारुतीची सर्वाधिक पसंती असलेल्या हॅचबॅक कार वॅगानारकडून कंपनीकडून बंपर डिस्काऊंट मिळतोय. वॅगानाच्या पेट्रोल मॅन्युएल, पेट्रोल एएमची आणि सीएनजी मॅन्युअलवर हा डिस्काऊंट मिळतोय. जर तुम्ही वॅगानार खरेदी करता तर मॅन्युअल ट्रान्समिशनवर ३० हजार आणि सीएनजी व एएमटी व्हेरिएंटवर ३५ हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. 

5/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

मारुती सेलेरियो - वॅगॅनारकडून सेलेरियोच्या पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल एएमटी आणि सीएनजी मॅन्युअल व्हेरिएंटवरही डिस्काऊंट मिळतोय. या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर २५ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळतोय. तर याच्याच एएमटी मॉडेलवर ३० हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. याप्रमाणेच तुम्ही २५ हजारांचा एक्सचेंज बोनसही मिळवू शकता.   

6/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

मारुती अर्टिगा - मारुतीच्या एमपीव्ही कार अर्टिगाचे नवे व्हर्जन या वर्षाच्या अखेरीपर्यंत बाजारात येऊ शकते. मात्र आता कंपनीकडून याच्या पेट्रोल व्हर्जनवर १५ हजार रुपये आणि डिझेल व्हर्जनवर २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. तर सीएनजी मॉडेलवर १० हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. याशिवाय तुम्ही अर्टिगाच्या डिझेलवर ३५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळवू शकता.

7/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

मारुती सियाझ - मारुती सियाझच्या पेट्रोल व्हर्जनवर १५ हजार आणि डिझेल व्हेरिएंटवर ३० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. याशिवाय तुम्ही कारच्या सर्व मॉडेल्सवर कंपनीकडून दिल्या जाणार्या १५ हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा फायदा उठवू शकता.

8/8

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars

मारुती इग्निस - काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की मारुती इग्निसचे डीझेल मॉडेलचे प्रॉडक्शन बंद करण्यात आले आहे. यातच कंपनीकडून डिझेल व्हेरिएंटची वेगाने विक्री होण्यासाठी चांगला डिस्काऊंट दिला जातोय. कंपनी इग्निसच्या डिझेल मॉडेलवर ७५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देतेय. तर पेट्रोल मॉडेलवरील डिस्काऊंट १५ हजार रुपये आहे. दोन्ही व्हर्जनवर २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळतोय.