6.49 लाखांच्या कारचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ; बूक झाल्या तब्बल 40 हजार कार; 'या' व्हेरियंटला सर्वाधिक मागणी

आकर्षक लूक आणि नवं इंजिन असणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही कार फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत 100 किग्रॅ हलकी झाली असून दुप्पट मायलेज देते.   

Jun 05, 2024, 18:50 PM IST

आकर्षक लूक आणि नवं इंजिन असणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही कार फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत 100 किग्रॅ हलकी झाली असून दुप्पट मायलेज देते. 

1/10

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नुकतंच घरगुती बाजारपेठेत Swift ची फोर्थ जनरेशन मॉडेलला 6.49 लाखांच्या किंमतीत लाँच केलं होतं.   

2/10

आकर्षक लूक आणि नवं इंजिन असणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही कार फर्स्ट जनरेशनच्या तुलनेत 100 किग्रॅ हलकी झाली असून दुप्पट मायलेज देते.   

3/10

नव्या मारुती स्विफ्टला आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक युनिट्सची बुकिंग मिळाली आहे. यामधील जवळपास 19 हजार 393 युनिट्स डिलर्सला पाठवण्यात आली आहेत.   

4/10

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या स्विफ्टचं मिड-स्पेस व्हेरियंट VXI आणि VXI (O) ला सर्वाधिक मागणी आहे. जवळपास 60 टक्के ग्राहकांनी या व्हेरियंटची निवड केली आहे.   

5/10

SWIFT VXI व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 7.30 लाख रुपये आहे. तर VXI (O) व्हेरियंटची किंमत 7.57 लाख आहे.  

6/10

नव्या स्विफ्टची एंट्री लेव्हल व्हेरियंट LXI ला जवळपास 11 टक्के लोकांनी निवडलं आहे. तर टॉप मॉडेल ZXI आणि ZXI+ व्हेरियंटला 19 टक्के लोकांनी निवडलं आहे. यांची किंमत अनुक्रमे 8.30 लाख आणि 9 लाख आहे.   

7/10

नव्या स्विफ्टमध्ये कंपनी नवं 1.2 लीटर क्षमतेचं Z सीरिज इंजिन देत आहे. जे 82hp ची पॉवर आणि 112Nm चा टॉर्क जनरेट करतं.  

8/10

नवी मारुती स्विफ्ट 25.72 किमी प्रतिलीटर मायलेज देईल. मागील मॉडेलच्या तुलनेत मायलेज 3 किमी जातस्त असेल असा कंपनीचा दावा आहे.   

9/10

नव्या मारुती स्विफ्टमध्ये कंपनी 9 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील भागात एसी वेंट्स, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल असे फिचर्स देण्यात आले आहेत.   

10/10

दरम्यान ही कार आधीपेक्षा जास्त सुरक्षित करण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरिटंयमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या होत्या. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलही मिळतो.