Indian Railway: एका ट्रेनची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? इंजिन आणि डब्यांची किंमत ऐकून हैराण व्हाल

Indian Railway Facts: भारतात जर तुम्हाला स्वस्तात प्रवास करायचा असेल तर ट्रेन (Train) हा सर्वोत्तम पर्याय आहे. अत्यंत सहजपणे आणि स्वस्वात प्रवास करण्यासाठी अनेकजण ट्रेनला प्राधान्य देतात. पण ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही कधी ही ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येत असेल असा विचार केला आहे का? किंवा ट्रेन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागत असतील? तर मग जाणून घ्या..  

May 22, 2023, 19:38 PM IST
1/8

भारतीय रेल्वेत वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन असून, प्रत्येक ट्रेनमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात. प्रत्येक ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतात. ट्रेनमधील डबे आणि त्यामधील सुविधांच्या आधारेच ट्रेनची किंमत ठरवली जाते.   

2/8

ट्रेनमध्ये लागणारा जनरल डबा, स्लीपर, फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी डबा बनवण्यासाठी वेगवेगळा खर्च येतो.   

3/8

ट्रेनमधील इंजिन सर्वात महाग असतं आणि ते तयार कऱण्यासाठी सर्वात जास्त पैसे खर्च होतात.   

4/8

भारतीय रेल्वेंमध्ये दोन प्रकारचे इंजिन वापरले जातात. यामध्ये इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, एक इंजिन तयार करण्यासाठी जवळपास 13 ते 20 कोटी खर्च केले जातात. इंजिनची पॉवर यासह इतर गोष्टींच्या आधारे त्याची किंमत कमी जास्त होत असते.   

5/8

रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी किमान 2 कोटींचा खर्च येतो. त्या डब्यात दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या आधारे डब्यांची किंमत कमी जास्त होत असते.   

6/8

जनरल डबे तयार करण्यात कमी खर्च येतो. कारण यामध्ये कमी सुविधा असतात. जास्त सुविधा असल्याने एसी डबा तयार करण्यात जास्त पैसे खर्च होतात.  

7/8

एक ट्रेन तयार करण्यासाठी 66 कोटींचा खर्च येतो. एका प्रवासी ट्रेनमध्ये जवळपास 24 डबे असतात. प्रत्येक डब्याची किंमत 2 कोटी रुपये असते. या हिशोबाने सर्व डब्यांची किंमत 48 कोटी रुपये होते. यासह ट्रेनच्या इंजिनसाठी 18 कोटी रुपये मोजावे लागतात.   

8/8

देशातील पहिली सेमी हाय-स्पीड इंजिनलेस ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express Train) बनवण्यासाठी जवळपास 115 कोटींचा खर्च येतो. पीटीआयच्या वृत्तानुसार, नव्या जनरेशनच्या 16 डब्यांच्या इंजिनलेस सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेनसाठी 110 ते 120 कोटींचा खर्च येतो.