मोबाईलच्या सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करून करताय फार मोठी चूक; होईल नुकसान

तुमच्या स्मार्टफोनवर सॉफ्टवेअर अपडेट दिसू लागल्यावर तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करता. सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट न करता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अपडेट करेल असे म्हणत तुम्ही फार मोठी चूक करत असतात.

May 22, 2023, 19:31 PM IST

Smartphone Software Update : तुमच्या स्मार्टफोनवर सॉफ्टवेअर अपडेट दिसू लागल्यावर तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करता. सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट न करता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अपडेट करेल असे म्हणत तुम्ही फार मोठी चूक करत असतात.

1/7

Many benefits of updating software

सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे बरेच मोठे फायदे आहेत जे थेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिसतात. अनेक जण वर्षानुवर्षे त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट करत नाहीत कारण त्यांना वाटते की स्टोरेज भरेल. मात्र असे केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

2/7

smartphone storage

तुम्हीही असे युजर असाल आणि स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल होईल म्हणून सॉफ्टवेअर अपडेट करत नसाल तर काळजी करु नका तुमचाही फोन लवकरच खराब होऊ शकतो.

3/7

motherboard blast

जर तुम्ही स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर बऱ्याच काळापासून अपडेट करत नसाल आणि त्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा मदरबोर्ड उडू शकतो. (फोटो - pixabay)

4/7

mobile motherboard

एकदा मदरबोर्ड उडाला की तुमचा स्मार्टफोन कधीही काम करणार नाही. तुम्ही तो सुरू करू शकणार नाही किंवा कॉलिंग आणि मेसेजिंगसुद्धा वापरू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला मदरबोर्डच बदलावा लागेल.

5/7

smartphone speed

जेव्हाही कोणत्याही स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट केले जाते तेव्हा ते स्मार्टफोनचा वेग वाढतो आणि स्पीड वाढल्यामुळे गरम होण्याची समस्या कमी होते.

6/7

smartphone hang

पण जर तुम्ही स्मार्टफोनच्या अपडेटकडे दुर्लक्ष करत असाल, तर लक्षात ठेवा की यामुळे तुमचा स्मार्टफोनचा वेगाने गरम होऊ शकतो. यामुळे तुमचा स्मार्टफोन फोन हँग होऊ लागेल.

7/7

samsung update

जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष करता  तेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये लॅगिंगची समस्या येते. अशावेळी तुम्ही मल्टीटास्किंग करू शकत नाही. तसेच तुम्हाला गेम खेळताना किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग करताना समस्यांना सामोरे जावे लागते.