बबल रॅप फोडल्याने खरंच तणाव कमी होतो का? जाणून घ्या काय आहे सत्य

तुम्हाला बबल रॅप दिसल्यानंतर ते फोडण्याची इच्छा होते का? तणावात असताना बबल रॅप फोडल्यास तणाव कमी होण्यात मदत मिळते असं सांगितलं जातं. पण खऱंच तसं आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य?  

Jul 25, 2023, 16:01 PM IST
1/9

तुम्हाला बबल रॅप दिसल्यानंतर ते फोडण्याची इच्छा होते का? तणावात असताना बबल रॅप फोडल्यास तणाव कमी होण्यात मदत मिळते असं सांगितलं जातं. पण खऱंच तसं आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य?  

2/9

जेव्हा एखादी नवी वस्तू घरी येते, तेव्हा त्याच्या पॅकिंगला बबल रॅप असतो. यानंतर घरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण बबल रॅप फोडण्यास सुरुवात करतात. काहीजण तर तणावात असतानाही बबल रॅप फोडण्यास सुरुवात करतात.  

3/9

बबल रॅप फोडताना काहींना मजा येते. दरम्यान तणावात असताना बबल रॅप फोडल्यास तणाव कमी होण्यात मदत मिळते असं सांगितलं जातं. पण खऱंच तसं आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य?  

4/9

1 मिनिट बबल रॅप फोडल्यास 33 टक्के तणाव होतो कमी

एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, 1 मिनिटापर्यंत बबल रॅप फोडल्याने तणावाचा स्तर 33 टक्के कमी होतो.   

5/9

विशेष म्हणजे, 30 मिनिट मसाज केल्यानंतर इतका तणाव दूर होतो. त्यामुळे तुम्ही बबल रॅप फोडल्यास तणाव दूर होतो हे नक्की.   

6/9

तणावात स्नायूंवर ताण

बबल रॅप फोडल्यानंतर जो आवाज येतो, ती एखाद्या एंटी-स्ट्रेस म्हणून काम करतो.   

7/9

तणावात अनेकदा आपलं शरीर फाइट किंवा फ्लाइट मोडला अॅक्टिव्ह करतं. अशा स्थितीत स्नायूंवर ताण पडतो. याचं कारण तुमची शरीर त्या स्थितीशी लढण्यासाठी किंवा त्याच्यातून पळ काढण्याच्या तयारीत असतं.   

8/9

हेच कारण आहे की, जेव्हा व्यक्ती तणावात असते तेव्हा हाताची बोटं किंवा पाय हलवण्यास सुरुवात करतो.  

9/9

बबल रॅप तणाव कमी कसा करतंय़

जसं की सांगण्यात आलं आहे तणावात स्नायूंवर ताण येतो, अशा स्थितीत जर तुम्ही बबल रॅप फोडलं तर नर्व्हस एनर्जी त्यात खर्च होते. त्यामुळे तुमचा तणाव फार कमी होतो.