अजित पवारांचा विरोधी पक्षाच्या आमदारांवरही निधीवर्षाव, सर्वाधिक निधी 'या' आमदाराला

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या निधीवर्षावात शरद पवार गटाच्या आमदारांनाही भरघोस निधी (Fund) मिळाल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय.  शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मतदारसंघासाठी तब्बल 580 कोटींचा निधी देण्यात आलाय. तर माजी मंत्री राजेश टोपेंनाही 293 कोटी मिळाले आहेत. तर सर्वाधिक 742 कोटींचा निधी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघाला मिळालाय. 

Jul 25, 2023, 14:41 PM IST

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या निधीवर्षावात शरद पवार गटाच्या आमदारांनाही भरघोस निधी (Fund) मिळाल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय.  शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मतदारसंघासाठी तब्बल 580 कोटींचा निधी देण्यात आलाय. तर माजी मंत्री राजेश टोपेंनाही 293 कोटी मिळाले आहेत. तर सर्वाधिक 742 कोटींचा निधी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघाला मिळालाय. 

1/5

जयंत पाटील यांच्या वाळवा मतदारसंघाला 580 कोटी, राजेश टोपे यांच्या मतदारसंघाला 293 कोटी, तर रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 210 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. 

2/5

अजित पवार गटातील दत्ता भरणे यांच्या इंदापूर मतदारसंघाला 436 कोटीत, मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघाला 291 कोटी, तर किरण लहामाटे यांच्या अकोलो मतदारसंघाला 116 कोटी जाहीर करण्यात आलेत.

3/5

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या महाड गटाला 134 कोटी, अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघाला 58 कोटी, महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदारसंघाला 48 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 

4/5

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर मतदारसंघाला सर्वाधिक म्हणजे तब्बल 742 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 

5/5

तर भाजपचे उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मतदारसंघाला सर्वात कमी म्हणजे 28 कोटी निधी देण्यात आला आहे.