कोल्ड्रिंक, सोडामुळे पोटातला गॅस बाहेर पडतो का?

महत्त्वाचे - ही माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. ही माहिती केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिलेली आहे. झी 24 तास याची पृष्टी करत नाही.

May 10, 2023, 19:24 PM IST

महत्त्वाचे - ही माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. ही माहिती केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिलेली आहे. झी 24 तास याची पृष्टी करत नाही.

1/6

stomach gas cold drink

गॅस झाल्यानंतर आपण कोल्ड्रिंक्स पितो आणि त्यानंतर ढेकरच्या माध्यमातून गॅस पोटातून बाहेर पडल्याचे आपल्याला वाटतं. पण तसं होत नाही. पोट फुगणे किंवा गॅस झाल्यावर अनेकजण कोल्ड्रिंक्स किंवा सोडा पिण्याचा घरगुती उपाय करत असतात. गॅसची समस्या असणारे अनेक जण महिनोन महिने हाच उपाय करत असतात. पण ही पूर्णपणे चुकीची सवय आहे.

2/6

Side effects of cold drinks

कारण कोल्ड्रिंक्स पिऊन असे लोक पोटफुगीच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष करत राहतात आणि पुढे जाऊन ही समस्या आणखी गंभीर बनते. तसेच  कोल्ड्रिंक्सच्या दुष्परिणामांमुळे नवीन समस्या देखील निर्माण होऊ शकतात.   

3/6

ulcer

जेवणानंतर पोट फुगण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये अल्सर, पित्ताशयाचा दाह, किडनी स्टोन, यकृताचा त्रास, कमजोर हृदयाची इत्यादींचा समावेश असू शकतो.

4/6

Carbon dioxide gas

कोल्ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साइड वायू असतो, त्यामुळे त्यामध्ये बुडबुडे किंवा फेस तयार होतो. जेव्हा कोल्ड्रिंक तुमच्या पोटात पोहोचतो तेव्हा विरघळलेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा गॅसमध्ये बदलतो आणि ढेकर देऊन बाहेर जातो. 

5/6

stomach gas

लोकांना असे वाटते की यामुळे त्यांच्या पोटात अडकलेला गॅस बाहेर पडला आहे. मात्र असे होत नाही. याउलट कोल्ड्रिंकमुळे तयार झालेला गॅस ढेकरच्या रुपाने बाहेर येतो. हा ढेकर लोकांना फक्त मानसिक समाधान देतो. त्यामुळे जेव्हाही गॅस तयार होतो लोक कोल्ड्रिंकचा अतिवापर करतात.

6/6

Carbonated cold drinks

सोडा किंवा कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स प्यायल्याने वजन वाढणे, यकृतामध्ये चरबी जमा होणे, पोटाची चरबी वाढणे, मधुमेह हृदय रोग, दात खराब होणे असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.