एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहाणार? निकालानंतर 'या' 5 शक्यता

  शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या सुप्रीम निकालाचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. कोणत्याही क्षणी सुप्रीम निकाल येऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांनी अनेक तर्क मांडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल? 16 आमदार अपात्र ठरले तरी  उर्वरित 24 आमदारांचं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निकालानंतर काय शक्यता असू शकतात.

| May 10, 2023, 19:15 PM IST

Maharashtra Politics :  शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या सुप्रीम निकालाचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. कोणत्याही क्षणी सुप्रीम निकाल येऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञांनी अनेक तर्क मांडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल? 16 आमदार अपात्र ठरले तरी  उर्वरित 24 आमदारांचं काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निकालानंतर काय शक्यता असू शकतात.

1/5

सुप्रीम कोर्टानं स्टेटसको अँटी म्हणजेच पूर्व परिस्थिती कायम ठेवण्याचा निकाल दिला तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात, असं मत उल्हास बापटांनी व्यक्त केले आहे. 

2/5

15 तारखेला सत्तासंघर्ष घटनापीठातील न्यायमूर्ती शाह निवृत्त होतायत. त्यापार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा उद्याच निकाल लागणार आहे..

3/5

 तर्क मांडले गेलेत. शिंदे अपात्र ठरले आणि त्यांची आमदारकी गेली तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाहतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

4/5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. 

5/5

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.