भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण वजन वाढू नये म्हणून ब्राऊन राईस खातात. पण भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? हे आज जाणून घेऊया.

Mar 02, 2024, 21:13 PM IST
1/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

भात खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकजण एकतर भात कमी खातात किंवा भात खाणंच सोडून देतात.   

2/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

तांदूळ हा आपल्या आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहे. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे. 

3/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

बर्‍याचदा लोक भाताचा संबंध लठ्ठपणाशी जोडतात. पण ते शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे बरोबर नाही. 

4/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

तांदळामध्ये शरीराला फिट ठेवणारे अनेक घटक असतात. जर आपण संतुलित आणि पौष्टिक आहाराचा विचार केला तर भात हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. 

5/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

भात हा कमी चरबी, कमी साखर, ग्लूटेनमुक्त आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीज आणि लोह यासारखे घटक देखील आहेत.

6/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना त्यात जास्त प्रमाणात तेल किंवा तूप वापरलं जातं. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढून लठ्ठपणा येतो.  

7/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

त्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार भात खाणं आणि कमी तेल, तूप वापरणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे असते. 

8/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

भात हा भाज्यांसोबत खाल्ला तर त्याचे अनेक फायदे असतात. पण जर तुम्ही रोज तूप, तेल, लोणी यांसारख्या पदार्थांसोबत भात खात असाल तर यामुळे तुमच्या वजनात वाढ होते. 

9/9

Does Rice Make You Weight Gain know the Truth behind

भात तयार करताना त्यात इतर डाळी टाकून खिचडी बनवणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात.