२० हजार फूट उंचीवर जवानांसाठी पोहचला पिज्झा...

सोशल मीडियावर सध्या एक फोटो वेगानं व्हायरल होताना दिसतोय. हा फोटो प्रजासत्ताक दिनाचा आहे. हे फोटो 'डॉमिनोज'नं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेत. 

Jan 29, 2019, 12:04 PM IST
1/6

'डोमिनोज'ची मोहीम

'डोमिनोज'ची मोहीम

सियाचीनच्या २० हजार फूटांच्या बर्फाच्छादित टेकड्यांवर जवानांसाठी 'डोमिनोज'नं गरम पिज्झा पोहचवला. जवानांनीही या पिज्झाचा आस्वाद घेतला. 

2/6

सियाचीन...

सियाचीन...

तुम्हाला माहिती असेलच की, सियाचीन हे जगातील सर्वात उंच आणि थंड युद्ध क्षेत्रापैंकी एक आहे.

3/6

गरम पिज्झा

गरम पिज्झा

आशावेळी सियाचीनमध्ये तैनात भारतीय जवानांपर्यंत गरम पिज्झा पोहचवण्यासाठी 'डोमिनोज'नं एक स्पेशल टीम तयार केली होती. 

4/6

उणे ४० अंश तपमान

उणे ४० अंश तपमान

सियाचीनच्या या टेकड्यांवर तपमान उणे ४० अंशाहूनही कमी असतं... अशावेळी जवानांपर्यंत गरम पिज्झाचा आस्वाद पोहचवणंही तितकंच कठिण काम होतं.

5/6

जवानांप्रती आदर

जवानांप्रती आदर

'हे ते जवान आहेत जे अनेक कठिण परिस्थितींचा सामना करत देशाची आणि आपली रक्षा करतात' असं म्हणत डोमिनोजनं जवानांप्रती आदर व्यक्त केला. 

6/6

तीन महिन्यांचा प्रयत्न यशस्वी

तीन महिन्यांचा प्रयत्न यशस्वी

तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर १२ जणांची एक टीम एअर फोर्सच्या मदतीनं जवानांसाठी पिज्झा घेऊन सियाचीनच्या टेकड्यांवर दाखल झाली, अशीही माहिती 'डोमिनोज'नं दिलीय.