Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही 'या' 6 चुका करू नका

भाद्रपद अमावस्या 2 सप्टेंबरला आहे. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात. हा दिवस पितरांचे श्राद्ध विधी करण्यासाठी आणि भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. 

| Aug 31, 2024, 18:19 PM IST
1/6

स्मशानभूमीकडे जावू नका

सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे.

2/6

मांस-मासे

सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करु नये.  त्यामुळे या गोष्टी खाणे टाळा. 

3/6

शांतता राखा

त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा. कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका. 

4/6

शुभ कार्य

या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करु नये. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरु करू नये. 

5/6

पितरांना नैवेद्य

सोमवती अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामे केली जातात. 

6/6

राग आणि अहंकार

या दिवशी राग आणि अहंकार टाळा. स्वत: च्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय व्यक्तीला त्रास देऊ नका.