स्वप्नात तुम्हाला 'ही' लोकं दिसली तर व्हा सावध; अशुभ घटनांची असतात लक्षणं

Dream Interpretation: रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात. दरम्यान स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्नं आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ चिन्हांकडे निर्देश करतात.   

| Jul 15, 2024, 12:12 PM IST
1/7

स्वप्न शास्त्रानुसार, व्यक्ती झोपेत असताना स्वप्ने पाहतो, परंतु तुम्हाला माहितीये का की, ही स्वप्ने भविष्याशी संबंधित आहेत. काही स्वप्ने आहेत जी भविष्यात काही अप्रिय घटना घडण्याचे संकेत देतात. स्वप्न शास्त्रामध्ये अशी काही स्वप्ने अशुभ मानली जातात. या स्वप्नांबद्दल जाणून घ्या.

2/7

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमचे मृत आई-वडील जिवंत दिसले तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ ते दुःखी आहेत आणि तुम्हाला संदेश देऊ इच्छित आहेत. 

3/7

स्वप्न शास्त्रात असंही म्हटलंय की, जर तुमचे मृत आई-वडील तुमच्या स्वप्नात काही शोधताना दिसले तर ते अशुभ चिन्ह आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की ते एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यावर रागावले आहेत.

4/7

स्वप्नात कोणत्याही पूर्वजांना पाहणं हे स्वप्न शास्त्रात शुभ मानलं जात नाही. अशा परिस्थितीत, त्याला कळू द्या की त्याची एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून त्याला तुमच्याशी काही बोलायचं आहे. 

5/7

ज्योतिष शास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही स्वतःला एखाद्या मृत व्यक्तीशी बोलताना पाहिलं तर ते स्वप्न शास्त्रातही अशुभ चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ आयुष्यात काही वाईट घटना घडू शकतात. 

6/7

स्वप्नात मृत मित्र पाहणं देखील शास्त्रात चांगलं मानलं जात नाही. हे लक्षण आहे की तुम्हाला भविष्यात काही दुखापत होण्याचं असू शकतं.

7/7

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे पूर्वज रागावलेले दिसले तर ते देखील अशुभ चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की, त्यांना एखाद्या गोष्टीची काळजी आहे आणि त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)