Ducati ने लॉन्च केली 10 लाखांची बाईक, फोटो पाहून डोळ्याचे पारणे फिटतील !

Mar 16, 2021, 12:24 PM IST
1/6

स्पोक व्हीलमुळे बॅलेंस

स्पोक व्हीलमुळे बॅलेंस

डुकाटी ने या बाइक्सच्या फ्रंटला पिरेली स्कोरपियन™ रैली एसटीआर 120/70 R19 टायर आणि रीयरमध्ये पिरेली स्कोरपियन™ रैली एसटीआर 170/60 R17 टायर दिले आहेत. जे ऑफ रोड आणि दुरच्या प्रवासासाठी चांगला बॅलेंस राखतात.

2/6

पावरफूल इंजिंन

पावरफूल इंजिंन

इंजनबद्दल बोलायचं झाल्यास डुकाटीने इन बाइक्स में 803 CC L-twin two-valve इंजन दिले आहे. जे 8,250 rpm वर 73 HP ची पॉवर देते. तर 5,750 rpm वर मैक्सिमम टॉर्क जेनरेट करते. ही बाइक राइडिंगमध्ये जबरदस्त पॉवरचा अनुभव देते.

3/6

6-स्पीड गियरबॉक्ससारखे फिचर्स

6-स्पीड गियरबॉक्ससारखे फिचर्स

डुकाटी ने दोन्ही बाइक्स (Scrambler Nightshift और Scrambler Desert Sled) ला 6-स्पीड गियरबॉक्स दिलेयत. यामध्ये मल्टी प्लेट क्लचचा सपोर्ट मिळतो जो हाइड्रोलिक कंट्रोलसोबत चालतो.

4/6

LED लाइट आणि फ्लॅट सीट

LED लाइट आणि फ्लॅट सीट

लाईटिंगबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही बाईकच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस एलईडी दिवे आहेत. जे रात्री उशिरा प्रवास करण्याचा वेगळा अनुभव देतील. याव्यतिरिक्त, स्क्रॅम्बलर नाईटशिफ्टमध्ये कॅफे रेसर-शैलीतील फ्लॅट सीट आहे, जी रायडर आणि प्रवाशांसाठी आरामदायक आहे.

5/6

Ducati बाईकची किंमत

Ducati बाईकची किंमत

डुकाटी ने Scrambler Nightshift ची एक्स शोरूम किंमत 9 लाख 80 हजार ठेवली आहे. डेझर्ट स्लेडची किंमत 10 लाख 89 हजार निश्चित करण्यात आली. दिल्लीमध्ये असलेल्या शोरूममधील ही किंमत आहे. सोमवारपासून कंपनीने या बाईकचे बुकिंगही सुरू केले आहे.

6/6

अशी करा बुकींग !

अशी करा बुकींग !

भारतात Ducati कडे एकूण 9 डीलरशिप आहेत. तेथून आपण या बाईकसाठी बुकिंग करू शकता. हे डिलरशिप दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, कोलकाता आणि चेन्नई येथे आहेत.