कांद्यामुळं मतदारसंघात वांदा? महाराष्ट्रातील या खासदारांना निवडणुकीत बसणार नाराजीचा फटका?

कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय. त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये एनडीएच्या खासदारांना बसण्याची शक्यता आहे. कांद्यामुळं कोणकोणत्या मतदारसंघात वांदा होऊ शकतो.

Aug 22, 2023, 22:40 PM IST

Onion Export Issue :  कांद्यानं आतापर्यंत भल्याभल्यांना रडवलं. कांद्याच्या मुद्यावरून सरकारं गडगडली आहेत आता पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न पेटलाय. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. त्यांच्या नाराजीचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

1/6

कमी दर्जाच्या कांद्याचं काय, असा प्रश्न सामान्य शेतक-यांना सतावतोय. तो सोडवण्यासाठी सरकारनं आताच खबरदारी घ्यायला हवी. 

2/6

शेतक-यांची ही नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.. केंद्र सरकारनं २४१० रूपये क्विंटल दरानं २ लाख मेट्रीक टन कांद्यांची नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे. 

3/6

लोकसभा मतदारसंघांमधील विधानसभेच्या जवळपास २० मतदारसंघांमध्येही महायुतीच्या उमेदवारांना शेतक-यांची नाराजी भोवण्याची शक्यता आहे. 

4/6

या मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादकांची संख्या लक्षणीय आहे.

5/6

 आज शेतक-यांना रडवणारा हा कांदा आगामी निवडणुकीत सत्ताधा-यांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. 

6/6

राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात कांद्यामुळं वांदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, दिंडोरीतून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार,  धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे आणि नगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघात फटका बसू शकतो.