'या' चुकांमुळे तरुणपणातच मेंदू होतो म्हातारा!

शरीर निरोगी असेल तर मेंदू देखील  निरोगी असतो. शरीराची काळजी घेतली नाही तर मन देखील आजारी पडते. चुकीच्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 

Nov 22, 2023, 20:28 PM IST

Mental health : शारिरीक स्वास्थ्यासह आपले मानसिक स्वास्थ देखील महत्वाचे आहे. मानसिक स्वास्थ हे मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. मात्र, न कळतपणे आपल्याच चुकांमुळे   तरुणपणातच मेंदूची कार्य क्षमता वृद्धांसारखी होते. 

 

1/7

काही चुकांमुळे मेंदू तरुणपणात म्हातारा होतो. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो.  यामुळे मानसिक स्वास्थ चांगले रहावे यासाठी आपला दिनक्रम ठरवणे गरजेचे आहे.  

2/7

अनेक जण सकाळी नाश्ता करत नाही. हे मेंदूसाठी घातक आहे. कारण, नाश्ता फक्त शरीरारालच नाही तर मेंदूला देखील दिवसभरासाठी उर्जा देतो. यामुळे नाश्ता करणे अत्यंत गरजेचे आहे.   

3/7

कधी कधी सतत खात राहणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाणे देखील मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. 

4/7

पुरेशी झोप खूप गरजेची आहे. कमी वेळ झोप घेतल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते. कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे आहे. 

5/7

जास्त प्रमाणात गोड खाणे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करु शकते.  गोड पदार्थ खाता तेव्हा रक्तातील ग्लुकोज अचानक वाढते आणि मेंदू ओव्हरड्राइव्ह मोडमध्ये जातो. यामुळे अतिक्रियाशीलता आणि मूड स्वींग होवू शकतात.

6/7

 आजारी असताना काम करणे हे फक्त शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वस्थासाठी देखील अत्यंत धोकादायक आहे. आजारी असताना काम केल्यामुळे मेंदूवर अतिरिक्त तणाव येतो.   

7/7

धूम्रपानामुळे मेंदूचे सर्वाधिक नुकसान होते. धूम्रपान मेंदूला लवकर वृद्धापकाळाकडे घेऊन जाते. यामुळे स्मरणशक्ती, शिकण्याची शक्ती, विचार करण्याची क्षमता आणि काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते.