PHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम

Early Age Marriage Side Effects : भारतात साधारण: 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र, देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधीच अवैध्यरित्या लावलं जातं. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणे देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का?

| May 16, 2024, 10:59 AM IST
1/7

मानसिकतेत बदल

अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक ठिकाणी सामाजिक संस्था देखील काम करतात. त्यामुळे आता लोकांची मानसिकतेत आता बदल देखील होताना दिसतोय.

2/7

शिक्षण महत्त्वाचं

लग्नाचं वय झालं म्हणून अनेक तरुणी शिक्षणावर पाणी सोडताना दिसतात. घरच्यांचा दबाव याला अनेकदा कारणीभूत असतो. मात्र, अशा गोष्टी मुलींना धोक्यात टाकू शकतात. लैगिंक छळ आणि संगोपणाची जबाबदारी लवकर खांद्यावर येते.

3/7

आरोग्यावर परिणाम

अनेकदा लवकर लग्न झाल्याने मुलींच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. मुली कमी वयात गरोदर राहिल्याने लवकर अशक्तपणा आणि लैगिंक रोगांचा धोका वाढतो.

4/7

समाजाची वागणूक

लवकर लग्न झालेल्या मुलींकडे जगाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा असतो. अनेकदा मुली समाजापासून विभक्त होतात. त्याचबरोबर त्यांना आवडीनिवडी जोपासण्याची संधी मिळणार नाही.

5/7

आर्थिक समस्या

लवकर लग्न केल्याने शिक्षण पूर्ण होत नाही. त्यामुळे नोकरी किंवा इतर गोष्टींमधून आर्थिक उत्पनन मिळत नाही. त्यातून आर्थिक समस्या देखील जाणवतात.

6/7

व्यक्तीगत विकास

लवकर लग्न झालेल्याने व्यक्तीगत विकास देखील रखडतो. सामाजिक जीवनाची मुल्य ओळखता येत नाहीत. तसेच कलागुण आणि कौशल्य विकसित करता येत नाहीत.

7/7

जोडीदारावर अवलंबित्व

लवकर लग्न केल्याने मुलींना अनेकदा जोडीदारावर अवलंबून रहावं लागतं. त्यातून स्व:ची ओळख आणि स्वाभिमान जपता येत नाही.