Mumbai Metro : मुंबईकरांची नवीन 'लाईफलाईन' आजपासून सुरु; दीड तासाचा प्रवास करा आता काही मिनिटांत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईच्या मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 या मार्गिकांचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधून प्रवासही केला.

Jan 20, 2023, 09:44 AM IST
1/6

metro modi

2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच मेट्रो वाहिन्यांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना करण्यात आले होते. त्यानंतर आता 35 किमीच्या दोन टप्प्यांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  

2/6

metro rail

मेट्रो 2 A (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले.

3/6

metro line

शुक्रवारी 4 वाजल्यापासून मेट्रो 2 A आणि 7 मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यामुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. यासोबत मेट्रो 1 (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवास आणखी सोपा झालाय.

4/6

metro work

सुमारे 12,600 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या मेट्रोतून प्रवास करण्यासाठी एमएमआरडीएने  ई – तिकिटाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 60 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  

5/6

metro fare

मेट्रो 7 च्या 16.5 किमी मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 30 रुपये तर मेट्रो-2A च्या 18.6 किमी प्रवासासाठी  भाडे 30 रुपये असणार आहे.

6/6

metro station

कोणत्या मार्गावर थांबणार मेट्रो? गुंदवली स्टेशन ते दहिसर पूर्व प्रवासादरम्यान गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाड, राष्ट्रीय उद्यान आणि दहिसर पूर्व ही स्थानके असणार आहेत. तर अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम या मार्गादरम्यान, डीएन नगर, लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, मंडपेश्वर आयसी कॉलनी कांदरपाडा या स्थानकांवर मेट्रो थांबणार आहे.